शंखनाद ! निवडणुकीची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं रणशिंग

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केली आहे. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेले असून देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शंखनाद ! निवडणुकीची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं रणशिंग
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 4:42 PM

विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शंखनाद अशी पोस्ट केली आहे. यासोबत फडणवीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. महाराष्ट्रात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी आहे, तर महिला मतदारांची संख्या ४.६६ कोटी आहे. तरुण मतदार १.८५ कोटी आहेत. तर २९.९३ लाख नवीन मतदार आहेत. असे एकूण राज्यात ९.३५ कोटी मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत.

२२ तारखेला निवडणुकीची अधिसुचना जाहीर होणार आहे. तर २९ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ३० तारखेला अर्जाची छानणी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. तर महाविकासआघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती असणार आहे. या शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोटे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.