Devendra Fadnavis Tweet: समझदार को इशारा काफी की कोतेपणा? फडणवीसांचं ते ट्विट चर्चेत, ठाकरे, देसाई म्हणजे ‘ऑदर लीडर्स’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी पत्रिकेत नाव नसल्याने या कार्यक्रमाकडे पाठ तर फिरवलीच. पण मुख्यमंत्री मोदींच्या स्वागतालाही गेले नाही. मोदींच्या स्वागताला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिसून आले.
मुंबई : रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) देण्यात आला. त्यासाठी मोदी मुंबईत दाखल झाले होते. मात्र याच कार्यक्रमावरून आता जोरदार राजकारण रंगलं आहे. निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्यापासून ते मोदींच्या स्वागतापासून सर्व घडामोडींवर आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लगल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी पत्रिकेत नाव नसल्याने या कार्यक्रमाकडे पाठ तर फिरवलीच. पण मुख्यमंत्री मोदींच्या स्वागतालाही गेले नाही. मोदींच्या स्वागताला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिसून आले. तर शिवसेनेकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून यावेळी मंत्री आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई दिसून आले. या पत्रिकेत नाव नसल्यावरून कालपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा कोतेपणा असल्याचे म्हणत टीकेची झोड उडवली. तर दुसरीकडे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक एक खोचक ट्विट केले आहे.
अतुल भातखळकर यांचं ट्विट
समझदार को इशारा काफी… pic.twitter.com/u4cRzOo2Ay
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 25, 2022
समझदार को इशारा काफी की कोतेपणा?
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी फडणवीसांच्या ट्विटचा एक फोटो शेअर करत महाविकास आघाडीतील नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या ट्विटमध्ये मोदींचे स्वागत केल्याचा उल्लेक करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि “इतर” नेते उपस्थित होते असा उल्लेक केला आहे. इतर नेत्यांमध्ये त्या फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई दिसून येत आहे. त्यामुळे भातखळकरांनी हाच फोटो आणि फडणवीसांचं ट्विट शेअर करत टोलेबाजी केली आहे. “समझदार को इशारा काफी…” एवढेच कॅप्शन या फोटोला देत भातखळकरांनी महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत. त्यामुळे या ट्विटची सध्या जास्त चर्चा आहे.
सोहळा संपला वाद पेटला
हा पुरस्कार सोहळा पार पडल्यापासून अनेक नेते पत्रिकेत नाव नसल्याच्या मुद्द्यावरून मंगेशकर कुटुंबियांवर टीका करत आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सर्वात आधी हा मनाचा कोतेपणा असल्याचे म्हटले होते. मग भातखळकरांचं हे ट्विट मनिषा कायंदे यांना प्रत्युत्तर आहे का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच या आक्रमक होत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर हा मराठी माणसांचा अपमान असल्याची टीका केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही यावरून जोरदार टोलेबाजी केली होती. मुख्यमंत्री आणि शरद पवार या कार्यक्रमात असते तर हा कार्यक्रम आणखी चांगला वाटला असता म्हणत रोहित पवारांनी चिमटे काढले होते. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा संपला असाला तरी त्यावरून होणारा वाद संपत नाहीये.