AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत गुप्त बैठक, पंकजांच्या नाराजीवर चर्चा झाल्याची शक्यता

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Aurangabad meeting) यांनी औरंगाबादेत गुप्त बैठक घेतल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत गुप्त बैठक, पंकजांच्या नाराजीवर चर्चा झाल्याची शक्यता
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 12:43 PM

औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये धुसफूस सुरु असताना, तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Aurangabad meeting) यांनी औरंगाबादेत गुप्त बैठक घेतल्याचं समोर आलं आहे. काल दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी ही गुप्त बैठक घेतली. मुंबईहून नागपूरला जाताना फडणवीस यांनी औरंगाबादेतील नेत्यांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis Aurangabad meeting)

या बैठकीला औरंगाबाद शहरातील राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर ही बैठक झाल्याने या बैठकीला वेगळं महत्त्व आहे. या बैठकीत भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यांना विधानसभेला तिकीट मिळालं होतं, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेला तिकीट मिळालं नसावं असं चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र तोच न्याय गोपीचंद पडळकर यांना का नाही असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.

दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी स्वत:ही भाजपने  तिकीट न दिल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. बाहेरुन आलेल्यांना तिकीट मिळतं पण निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेतील राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.

(Devendra Fadnavis Aurangabad meeting)

संबंधित बातम्या 

Chandrakant Patil Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील  

विधानसभेला पडल्याने पंकजाताईंना विधानपरिषद तिकीट नाकारलं, मग पडळकरांना कसं दिलं? खडसेंचा सवाल

मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.