‘काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत’, शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शाह यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी शरद पवारांना राजकारणातला सर्वात मोठा भ्रष्टाचारी नेता म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेवर धनंजय मुंडे यांनी भुवया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे.

'काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत', शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य
'काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत', शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 10:29 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे”, असा घणाघात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलाय. तसेच अमित शाह यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण गायब होतं, असा आरोप अमित शाह यांनी केला. अमित शाह यांच्या शरद पवारांवरील या टीकेवर राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही. मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

“विशाळगडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात. धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होत. ते रद्द कुणाच्या काळात झालं आणि अडाणींना दिलं? याचा अभ्यास माध्यमांनी करावा. धरावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. तसेच आमचा उपयोग फक्त लोकसभेसाठी केला आणि वाऱ्यावर सोडलं हे आता मुस्लिम समाजच म्हणतोय”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

‘माझे खरे गुरू अजित पवारच’

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरू आहेत. मात्र, माझे खरे गुरू उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत. अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजित दादांनी मला इथपर्यंत पोहचवलं”, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

भाजप स्वबळाची तयारी?

“भाजपच्या स्वबळाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे. महायुतीतील कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवणार नाही. आम्ही एकत्र लढणार यात तीळमात्र शंका नाही. भाजप त्यांच्या जागांसंदर्भात निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.