धनंजय मुंडे यांचा वकिलांचा करुणासंदर्भात मोठा दावा, पत्नी नव्हे तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, कोर्टात नेमके काय झाले?
Dhananjay Munde & Karuna Sharma: आम्ही सर्व काही कगदपत्रे दाखल केली आहेत. १९९६ पासून कागदपत्रे आहे. त्यात पोसपोर्ट, मुलांचे जन्मदाखले आणि इतर सर्व काही आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केलेले अपील न्यायालय फेटाळेल, असे करुणा शर्मा यांनी म्हटले.

Dhananjay Munde & Karuna Sharma: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी करुणा शर्मा यांच्यातर्फे लग्नासंदर्भातील काही पुरावे दाखल करण्यात आले. परंतु धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा पत्नी नव्हत्या, त्यांच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचा दावा केला.
मुंबई कनिष्ठ न्यायालयाने करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु करुणा शर्मा यांनी दर महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी मागितली. त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे देण्याचे आदेश दिले होते. ते पुरावे आज करुणा शर्मा यांच्याकडून दाखल करण्यात आले.
याबाबत बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागेल, याची मला खात्री आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानंतर त्यांचे वकील हादरले आहेत. १९९६ पासून करुणा शर्मा त्यांच्या पत्नी असल्याचे पुरावे दिले आहेत. आपल्याकडे रेकॉर्डींगसुद्धा आहे. ते आज सादर करायला विसरलो. त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र २०१६ मधील आहे. त्यात त्यांची सही आणि अंगठा आहे. त्यातही करुण शर्मा पहिली पत्नी म्हटले आहे. आम्ही सर्व काही कगदपत्रे दाखल केली आहेत. १९९६ पासून कागदपत्रे आहे. त्यात पोसपोर्ट, मुलांचे जन्मदाखले आणि इतर सर्व काही आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केलेले अपील न्यायालय फेटाळेल, असा विश्वास करुणा शर्मा यांनी केला. लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे जरी नसले तरी ते राजश्रीकडे देखील नाही. आमचे लग्न मंदिरात झाले, असे करुणा शर्मा यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांनी माझे जीवन रस्त्यावर आणले. आज धनजय मुंडे यांना घरात बसवले आहे. मी गाडी घेऊन आले त्यावरून हंगामा केला. मला हिरॉईनची ऑफर होती पण मी पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० करोड रुपये देणार होते. मला आणि माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असे करुणा शर्मा यांनी म्हटले.
कोर्टात वकिलांचा युक्तीवाद सुरु असताना करुणा शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडे आणि मी २७ वर्षे सोबत होते. माझे वकील चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही. ते मी मांडते, असे सांगत करुणा मुंडे यांनी बाजू मांडली. त्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी म्हटले करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे लिव्ह इन रिलेशनशिफमध्ये होते, त्या पत्नी नाही, असा दावा त्यांनी केला होता.