गणेश चतुर्थीच्या दिवशी बैठक झाली, व्हिडीओ देऊ शकतो…; धनंजय मुंडे यांचा शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट काय?
या मतदारसंघाच सगळं वैभव फक्त सेल्फी काढण्यात घालायचे का? संसदरत्न पुरस्कार फक्त गोडाऊनमध्ये ठेऊन या मतदारसंघाचा विकास होणार आहे का? इथे बापू एक एक टीएमसीचा हिशोब करायला लागले आहेत. समोरचा भलेही संसदरत्न असेलं, त्याला टीएमसी लिटरमध्ये सांग असं म्हटल्यावर सांगता येईल?, असा टोला धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना घेरणारं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनीही भाजपसोबत जाण्याच्या शरद पवार यांच्या वाटाघाटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. साहेब आजही आमच्यासाठी आदरणीय आहेत. आमचे जाणते राजे आहेत. संपूर्ण रयत जाणत्या राजाचं कुटुंब असतं. त्यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं. त्याला संस्कार म्हणायचं आणि दादांनी केलं त्याला गद्दारी म्हणायची का? 2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे? कशी? बैठक झाली हे व्हिडिओसहीत मी देऊ शकतो. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या. हे त्यांनी केलं. ते संस्कार दादांनी केलं तर गद्दारी, असा हल्लाच धनंजय मुंडे यांनी चढवला.
धनंजय मुंडे हे पुरंदरला आले होते. यावेली त्यांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला. ते सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजपपासून लांब केलं. ती आमची चाल होती आणि उद्धव ठाकरे हसतायत. किती ही हतबलता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 53 पैकी 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं. त्यांनी कागदावर सह्या केल्या होत्या. दादा हा कागद तुम्हाला दाखवतील की नाही माहीत नाही. पण कधी तरी मी तो कागद दाखवणार आहे, असं धनजंय मुंडे म्हणाले.
त्यांच्या सांगण्याशिवाय दादा काहीच…
ज्यांना प्रतिष्ठा द्यायची होती त्यांना प्रतिष्ठा दिली. मी अजितदादांना ओळखतो. अजितदादांनी आजपर्यंत पवार साहेबांच्या थुका ओलांडून कधी राजकारण केलं नाही. जे काय केलं असेल ते त्यांच्या सांगण्यावरूनच केलं, त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाहीत. दादांना सांगायचं एक, करायचं दुसरं आणि झालं तिसरं की दादा खलनायक, असा हल्लाच त्यांनी शरद पवारांवर चढवला.
कुटुंबाचं भवितव्य ठरवायचं की?
ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान कोण होणार ही ठरवणारी आहे. ही निवडणूक माझ्या मराठवाड्याच्या मातीसाठी प्रतिष्ठेची आहे. घरी सून आली तरी आपण तिला लेक मानतो. या शिकवणीचा 2024 च्या निवडणुकीत कुठेतरी विसर पडायला लागलेला आहे. संकुचित मनोवृत्ती या निवडणुकीत व्हायला लागलेली आहे. या निवडणूकीत देशाचं भवितव्य ठरवायचं आहे की एका परिवाराचं भवितव्य ठरवायचयं? हे या निवडणुकीत ठरवायला लागेल, असं मुंडे म्हणाले.
सुनेत्रा वहिनी आल्या आणि…
धाराशिव या दुष्काळी जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये पवारांच्या घरी जी आमची मराठवाड्याची लेक सून म्हणून दिली गेली, ज्या सुनेला आज बाहेरच म्हटलं जातं. या सुनेवर टीका करताना एक मनात विचार आणा, दादांचा शुभविवाह 1985 साली झाला. सुनेत्रा वाहिनी सून म्हणून आल्या. हे जवाबदारीने मी बोलतोय. 1985 ला सुनेत्रा वहिनींचे पाय जेव्हा बारामतीला लागले, त्यानंतरच खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास चालू झाला, असंही ते म्हणाले.