‘धनंजय मुंडे आता सुटका नाही…’, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमके काय म्हटले?

एका टप्प्यावर आज राष्ट्रवादी पक्ष आहे. संघर्ष करावा लागत आहे. आता संघर्षाचे दिवस संपले आहेत. येत्या दोन- तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. कायम अवहेलना वाट्याला येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत ७२ % स्ट्राईक रेट मिलावला.

'धनंजय मुंडे आता सुटका नाही...', प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमके काय म्हटले?
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 2:33 PM

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय नव संकल्प शिबीर झाले. या शिबिरात राज्यभरातून पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आले होते. शिबिरातून पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. सुनील तटकरे म्हणाले, धनंजय बरे झाले तुम्ही आलात आणि बोललात. भुजबळ साहेब तुम्ही आलात. मोकळेपणाने बोललात. गेले काही दिवस तुमच्या विषयी ब्रेकिग न्यूज येत होत्या. गेल्या महिनाभरात तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलात ते मोकळेपणाने सांगितले. तुम्ही यापुढे अजित पवार यांच्या साथीने काम करत राहणार याची ग्वाही दिलीत याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो.

आता तुमची सुटका नाही…

सुनील तटकरे पुढे धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले, धनंजय २०१४ ते १९ जसे काम केले. तसेच काम आता करावे लागणार आहे. आता तुमची सुटका नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेत काम केले. ती फेज आता गेली आहे. पुन्हा मागे जाऊन चालणार नाही. आता पुढे जायचे आहे. दोन दिवस शिर्डीच्या ऐतिहासिक नगरीत आपण दोन दिवस जे चिंतन मनन करत बसलो होतो. आज दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे जण अतिशय उत्सुकतेने याठिकाणी उपस्थित आहात.

मुंबईतूनसुद्धा अजित पवार यांनी पसंती

पक्षातील घटनांचा आढावा घेताना तटकरे म्हणाले, एका टप्प्यावर आज राष्ट्रवादी पक्ष आहे. संघर्ष करावा लागत आहे. आता संघर्षाचे दिवस संपले आहेत. येत्या दोन- तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. कायम अवहेलना वाट्याला येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत ७२ % स्ट्राईक रेट मिलावला. दादा तुमचे राजकारण हे ग्रामीण भागाशी जोडलेले आहे. पण आपला पक्ष आता मुंबईसारख्या शहरात पोचला आहे. दादा आता तुमचा चेहऱ्या मुंबई सारख्या मोठ्या शहरातही पसंती मिळाली आहे. यापूर्वी आपण मुंबईमध्ये १५ जागांपुढे जाऊ शकलो नाही, हे सत्य आहे. पण आता तुमच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईत मोठा विजय मिळवू. दादा आपण जसे पुणे, पिंपरी चिंचवड भागाचा विकास केलात आणि इथला चेहरा झालात हेच आता मुंबईत करू, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

पक्षात कार्यकर्त्यांना संधी देणार

दादा प्रत्येक महापालिकेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून पक्षाची फळी बांधली तर पक्ष मजबूत होईल. दीर्घ काळ बाघितलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आजपासूनच कामाला लागा. कार्यकर्त्यामुळे आपण आज सत्तेवर बसलो आहेत. या कार्यकर्त्यांच्या मागे ताकत उभी करणार आहे. उमेदवारी कार्यकर्त्याला दिली पाहिजे याबाबत कोणाच्या मनात दुमत असण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि भगिनींना नक्की संधी दिली जाणार असल्याची ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....