शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरु होणार, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सामाजिक न्याय विभागची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईः राज्याच्या (Maharashtra) शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सामाजिक न्याय विभागानेसुद्धा कोविडच्या नियमांचे पालन करून वसतिगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विविट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे. कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढल्यानंतर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सामाजिक न्याय विभागची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही वसतिगृहे सुरू करताना त्या त्या जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करून, योग्य ती काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे.
कोरोना परिस्थिती अटोक्यात
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाच्या नियमानुसार सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोविडची परिस्थिती अटोक्यात आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आता शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरू करण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींची सामना करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणित नुकसान होत होते. यासाठी सामाजिक न्याय विभागाची ही वसतिगृहे कोरोनाच्या नियमांचे पालन करून वसतिगृहे चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ही वसतिगृहे आहेत त्या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन व वसतिगृहांच्या समन्वयाने ही विद्यार्थी वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लाभ होणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाशिवाय शहरात थांबण्याचा आधार नव्हता त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न मिठणार आहे.
संबंधित बातम्या