धाराशिवच्या उमेदवारांची नेमकी संपत्ती किती, उत्पन्न काय, किती गुन्हे दाखल? वाचा इत्यंभूत माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराकडून त्याच्या संपत्तीची माहिती मागवली जात आहे. तसेच उमेदवाराचं वार्षिक उत्पन्न किती, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुटुंबियातील सदस्यांची संपत्ती किती, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय, रोख रक्कम किती आहे, गुन्हे किती दाखल आहेत? याबाबतची सविस्तर माहिती मागवण्यात येते. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी शपथपत्राद्वारे याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.

धाराशिवच्या उमेदवारांची नेमकी संपत्ती किती, उत्पन्न काय, किती गुन्हे दाखल? वाचा इत्यंभूत माहिती
ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 8:13 PM

महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे आणि कुटुंबाचे संपत्तीचे विवरण निवडणूक विभागाकडे शपथपत्राद्वारे सादर करण्यात आले आहे. ओमराजे निंबाळकर यांचे 2022 वर्षाचे उत्पन्न 19 लाख 84 हजार इतके आहेत. तर त्यांच्या पत्नी संयोजनी निंबाळकर यांचं 7 लाख 83 हजार रुपये इतकं उत्पन्न आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात एक फौजदारी गुन्हा प्रलंबित आहे. त्यांच्यावर कलम 306, 420 (फसवणूक आणि जीवन संपवण्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा प्रलंबित आहे. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे 8 लाख 57 हजार रोख रक्कम तर पत्नीकडे 5 लाख 12 हजार रोख रक्कम असल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांची बँक आणि इतर अशी 1 कोटी 70 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. तर त्यांच्या पत्नी संयोजनी यांची 50 लाख रुपये इतकी गुंतवणूक शपतपत्रात दाखवण्यात आली आहे.

ओमराजे यांच्याकडे एक दुचाकी तर 2 चारचाकी गाडी आहे. त्यात एक इनोव्हा आणि एक एस क्रॉस गाडी तर पत्नीकडे वाहन नाही, अशी माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे. ओमराजे यांच्याकडे 113 ग्राम ( 11 तोळे ) सोने तर एक 48 हजाराची डायमंड अंगठी आणि पत्नी कडे 300 ग्राम (30 तोळे) सोने असल्याचं शपथपत्रात सांगण्यात आलं आहे.

ओमराजे यांच्याकडे एक रिव्हॉल्वर ( बंदूक ) आहे. ओमराजे यांच्यावर 22 लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज आहे. तर 2 लाख 50 हजार बँकेचं कर्ज आहे. ओमराजे यांच्याकडे 3 कोटी 88 लाख रुपयांची जमीन तर पत्नीकडे 1 कोटी 41 लाखांची जमीन आहे. ओमराजे यांच्या उत्पन्नाचं स्रोत शेती आहे. तर त्यांच्या पत्नी पेशाने वकील आहेत. तसेच शेतीदेखील त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. ओमराजे यांचे शिक्षण हे इंजिनियररिंग द्वितीय वर्ष इतकं झालं आहे.

धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि राणाजगजीत पाटील यांच्याही संपत्तीचे विवरण शपथपत्र निवडणुक आयोगकडे सादर करण्यात आलं आहे. अर्चना पाटील यांचे उत्पन्न 2022-23 मध्ये 7 लाख 73 हजार तर राणाजगजीतसिंह पाटील यांचे 65 लाख 47 हजार इतकं होतं. अर्चना पाटील यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही. अर्चना पाटील यांच्याकडे 5 लाख 35 हजार रोख कॅश आणि बँकेत 8 लाख 77 हजार रुपये रोख पैसे आहेत. तर राणा पाटील यांच्याकडे 7 लाख 56 हजार रक्कम आणि बँकेत 22 लाख 97 हजार रुपये पैसे आहेत.

अर्चना पाटील यांची बॉण्ड आणि इतर मध्ये 22 लाखांची गुंतवणूक केली आहे. तर राणा पाटील यांची 2 कोटी 6 लाख गुंतवणूक आहे. अर्चना पाटील यांच्याकडे 8 लाख 91 हजार कर्ज तर राणा यांच्यावर 5 कोटी 87 लाख कर्ज आहे.

अर्चना पाटील यांच्याकडे 1 लाख 41 हजार तर राणा यांच्याकडे 48 लाख 45 हजार रुपयांची शासकीय देणी आहे. अर्चना पाटील यांच्याकडे एकही गाडी नाही तर राणा यांच्याकडे एक दुचाकी, दोन चारचाकी गाडी आहे.

अर्चना पाटील यांच्याकडे 3 किलो 690 ग्राम असे (3 कोटी 54 लाखांचे सोने दागिने ) तर आमदार राणा यांच्याकडे 127 ग्राम (8 लाख 94 हजार ) सोने आहे. अर्चना पाटील यांच्याकडे 1 कोटी 47 लाखांची जमीन तर राणा यांच्यकडे 3 कोटी 86 लाखांची जमीन आणि 15 कोटींची नॉन ऍग्री / बिल्डिंग आहे. अर्चना पाटील यांना 66 लाख 95 हजार रुपयाचे देणे तर राणा यांना 5 कोटी 78 लाख रुपयांचे देणे आहे. अर्चना पाटील यांचे शिक्षण इंजिनियर पूर्ण ( etc ) तर उत्पन्न स्रोत शेती आणि नोकरी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.