धुळ्यात मनसेचं खळखट्याक नाही तर सौम्य आंदोलन, वृक्षतोड विरोधात प्रतिकात्मक वृक्ष बचाव आंदोलन

मनसेने अधिकृत वृक्षतोड आणि वृक्ष प्राधिकारण समितीविरोधात प्रतिकात्मक वृक्ष बचाव आंदोलन सुरु केलं आहे (Dhule MNS protest against felling).

धुळ्यात मनसेचं खळखट्याक नाही तर सौम्य आंदोलन, वृक्षतोड विरोधात प्रतिकात्मक वृक्ष बचाव आंदोलन
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 3:27 PM

धुळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यावेळी धुळ्यात मनसेकडून खळखट्याक नाही तर सौम्य पण प्रभावी आणि लक्ष वेधून घेणारं असं आंदोलन करण्यात आलं आहे. पर्यावरण प्रेमींना अभिमान वाटेल अशा विषयावरुन हे आंदोलन करण्यात आलं. मनसेने अधिकृत वृक्षतोड आणि वृक्ष प्राधिकारण समितीविरोधात प्रतिकात्मक वृक्ष बचाव आंदोलन सुरु केलं आहे (Dhule MNS protest against felling).

धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील हस्ती बँकेसमोर अधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या मागणीसाठी मनसेच्यावतीने धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सौम्य माध्यमातून पण आक्रमक असं आंदोलन सुरु केलं आहे. अधिकृत वृक्ष तोड आणि वृक्ष प्राधिकरण समिती विरूद्ध मनसेने प्रतीकात्मक वृक्ष बचाव आंदोलन छेडलं आहे (Dhule MNS protest against felling).

5 डिसेंबर 2020 रोजी शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील हस्ती बँकेसमोर बेकायदेशीरपणे वृक्षतोड करण्यात आली होती. या अनुषंगाने अधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी आक्रमक आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे धुळे महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले. त्यामुळे आज पुन्हा संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकृत वृक्षतोड आणि वृक्ष प्राधिकरण समिती विरुद्ध प्रतीकात्मक वृक्ष बचाव आंदोलन छेडले आहे.

बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना मनपा प्रशासन पाठिशी घालण्याचे काम करत आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. “उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार मनपा वृक्षसंवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य हे किमान बीएससी सायन्स अथवा अॅग्रीकल्चर डिप्लोमा असणे आवश्यक आहे. मात्र यासंदर्भात कुठलीही माहिती अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही. तसेच संघटना ही पाच वर्षे नोंदणीकृत असावी आणि त्या सदस्यांचे पर्यावरण कार्य असावे तसेच पुरस्कार प्राप्त असावा. संस्था ही सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक असावी, असे असताना देखील मनपा प्रशासन कुठलीही माहिती देण्यास तयार नसल्याचे चित्र समोर येत आहे”, असा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.

सदर बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती गठित करावी. अन्यथा न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा देखील मनसेने दिला आहे (Dhule MNS protest against felling).

हेही वाचा : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले नागपुरातील घरी, मातोश्रींकडून औक्षणाने स्वागत

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.