धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक जाहीर, भाजपवासी अमरीश पटेल जागा राखणार का?

कोव्हिडच्या संसर्गामुळे 1 एप्रिल 2020 रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पण आता रखडलेली निवडणूक पुन्हा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक जाहीर, भाजपवासी अमरीश पटेल जागा राखणार का?
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:32 PM

धुळे : कोरोनामुळे लांबवणीवर पडलेली धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar) विधानपरिषद (Council Election) निवडणूक अखेर आता होणार आहे. या निवडणुकांसाठी आता तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागा आहे. विधानपरिषद निवडणूकी आधी अमरीश पटेल यांनी भाजपत प्रवेश केला होता. अशात कोव्हिडच्या संसर्गामुळे 1 एप्रिल 2020 रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पण आता रखडलेली निवडणूक पुन्हा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (Dhule Nandurbar Legislative Council Election Announced)

या विधानपरिषद निवडणुकीसाठी नामांकनं जाहीर झाली असून 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर निवडणुकांसाठी जुनाच कार्यक्रम आयोग राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपकडून अमरीश पटेल रिंगणात आहेत तर काँग्रेसमधून अभिजीत पाटील हे दोन उमेदवार रिंगणात आहे.

कधी होणार मतदान? मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी मंगळवारी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून गुरुवारी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट आहे. महाविकास आघाडीतर्फे अभिजीत पाटील यांना जागा देण्यात आली आहे. तर भाजपकडून अमरीश पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत अमरीश पटेल? अमरीशभाई रसीकलाल पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यावेळी अमरीश यांचे बंधू आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेलही उपस्थित होते.

इतर बातम्या –

पदवीधर निवडणूक : भाजपच्या संग्राम देशमुखांना संभाजी ब्रिगेडच्या संग्राम देशमुखांचं आव्हान

नागपूर पदवीधर निवडणूक : दोघांपैकी एका अभिजीत वंजारींचा उमेदवारी अर्ज बाद

(Dhule Nandurbar Legislative Council Election Announced)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.