Narendra modi: पंडित नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत सर्वांचा आरक्षणास विरोध…नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर मोठा आरोप

Narendra modi speech in Dhule: काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही. बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये कायम राहणार आहे.

Narendra modi: पंडित नेहरु यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत सर्वांचा आरक्षणास विरोध...नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर मोठा आरोप
नरेंद्र मोदी, धुळे
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 1:16 PM

Narendra modi speech in Dhule: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. धुळ्यात शुक्रवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचा आता जातींमध्ये भांडणे लावण्याचा कट

काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत आहे. काँग्रेस यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. छोट्या जाती एकत्र राहिल्या तर त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे मी म्हणतो, एक आहे तर सुरक्षित आहे. आम्ही एकजुट राहून काँग्रेसचा खेळ उधळून लावायचा आहे.

महात्मा गांधी यांनी म्हटले होते…

विकासाचा नावावर आम्हाला पुढे जायाचे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी काँग्रेसचे विसर्जन करु इच्छित होते. त्यांना काँग्रेसमधील आजार माहीत होता. काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. काँग्रेसने ७५ वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. देशात दोन राज्यघटना होत्या. परंतु मोदी आला आणि त्यांनी देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू केली. काँग्रेस पुन्हा आता जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. काँग्रेस आघाडी त्या ठिकाणी पुन्हा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. हे देश आता स्वीकारणार नाही.ट

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने काश्मीरसंदर्भात फुटीरवाद्यांची भाषा बोलू नये. तुमचा हा हेतू पूर्ण होणार नाही. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही. बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये कायम राहणार आहे. महायुती तुमच्या परिवारासाठी काम करत राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा…

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.