या एसटी विभागाला सप्तश्रृंगी देवी पावली, कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न झालं कसं?

नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील यात्रोत्सवातून धुळे एसटी विभागाला सप्तशृंगी देवी पावली आहे. तब्बल एक कोटी रुपयांचे उत्पन्न या यात्रेच्या काळात एसटी विभागाला प्रवाशाच्या माध्यमातून मिळाले आहे.

या एसटी विभागाला सप्तश्रृंगी देवी पावली, कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न झालं कसं?
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 12:49 PM

धुळे : सप्तश्रृंगी गडावर चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. या यात्रोत्सवादरम्यान खान्देशातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर पायी जातात. यातील काही पायी तर काही महामंडळाच्या बसने गडावर जातात. गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महामंडळातर्फे दरवर्षी अधिक बसेस सोडण्यात येत असतात. या एसटीच्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी २५ लाख रुपयांचे उत्पन्न जादा मिळाल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली.

DHULE 2 N

९ आगारातून जादा बसेस

नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील यात्रोत्सवातून धुळे एसटी विभागाला सप्तशृंगी देवी पावली आहे. तब्बल एक कोटी रुपयांचे उत्पन्न या यात्रेच्या काळात एसटी विभागाला प्रवाशाच्या माध्यमातून मिळाले आहे. नांदूर येथील श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

२०० बसेस सोडण्यात आल्या

यावर्षीही धुळे विभागातर्फे २९ मार्च ते ५ एप्रिल २०२३ अशा सात दिवसांसाठी नांदुरीगडासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार,शहादा, अक्कलकुवा, नवापूर या आगारांमधून जवळपास २०० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. विभागातील बसेसनी १ हजार ५५३ फेऱ्या केल्या. यातून ७२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.

एसटीला देवी पावली

२०२२ मध्ये धुळे विभागातून १२६६ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यातून विभागाला १ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी विभागाला २५ लाखांचे जास्त उत्पन्न मिळाले. त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटी विभागाला सप्तशृंगी देवी पावली असंच म्हणावे लागेल.

एसटीच्या बसेस भंगार असल्याने एसटी खऱ्या अर्थाने तोट्यात आहे. खराब रस्ते असल्यावर एसची दुरावस्था दिसून येते. पण, देवीच्या दर्शनासाठी बऱ्याच लोकांनी या एसटीतून प्रवास केले. त्यामुळे एसटीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे ही देवी एसटीला पावली असचं म्हणावं लागेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....