‘अनिल देशमुख आणि माझी नार्को टेस्ट करा’, गिरीश महाजन यांचं ओपन चॅलेंज

मंत्री गिरीश महाजन यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नार्को टेस्टची खुली ऑफर दिली आहे. गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांना समोरासमोर चर्चेचं आणि नोर्को टेस्टचं चॅलेंज दिलं आहे. आता ते चॅलेंज अनिल देशमुख स्वीकारतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'अनिल देशमुख आणि माझी नार्को टेस्ट करा', गिरीश महाजन यांचं ओपन चॅलेंज
गिरीश महाजन आणि अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 4:46 PM

मनेश मोसोळे, Tv9 प्रतिनिधी, धुळे :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खुलं आव्हान दिलं आहे. अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, कोण खरं बोलत आहे हे समोर येईल, असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं आहे. धुळ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखकांवर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे यंत्रणेवर दबाव टाकून आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. वारंवार चुकीचे आरोप करून देशमुख हे स्वतःचा बचाव करत असल्याचा आरोपी त्यांनी केलेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देशमुखांविरोधात जबाब दिलेले असतानाही देशमुख खोटे दावे करत असल्याचा गिरीश महाजन यांनी सांगत, समोरासमोर चर्चेचं आणि नार्को टेस्टच आव्हान अनिल देशमुख यांना दिलं आहे. आता अनिल देशमुख गिरीश महाजन यांचे हे आव्हान स्वीकारतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीचं जागावाटप ठरलं का?

गिरीश महाजन यांनी महायुतीच्या जागावाटपाच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “महायुतीमध्ये जागा वाटपाचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र या संदर्भात तिन्ही पक्षांचे मोठे नेते एकमेकांशी वारंवार चर्चा करीत आहेत. तसंच याबाबत लवकरच निर्णय होईल”, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र या दरम्यान त्यांनी सर्व नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असल्या तरी जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचा त्यांनी स्पष्ट केले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

गिरीश महाजन यांचा विरोधकांवर गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेसाठी एससी, एसटी विभागाच्या निधी कमी करण्यात आलेला नसून काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. काही लोकांच्या सांगण्यावरून काही ठराविक लोक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केलेला आहे. राज्यामध्ये जातीपातीचं वातावर जातीपातीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. जनतेने जातीपातीच्या राजकारणात न पडता विकासाच्या बाजूने उभा राहण्याचं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.