मापात पाप ! कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अशी घडवली व्यापाऱ्याला अद्दल
या व्हायरल व्हिडीओवरून चर्चा सुरू आली. शेतकऱ्यांची फसवणूक कराल, तर अशी अद्दल घडलीचं पाहिजे, असं शेतकरी म्हणू लागले आहेत
धुळे : कधीकधी काही व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. कधी भावात तर कधी वजनात. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याने कापूस खरेदी केले. पण, ते खरेदी करताना त्याने वजनात फसवणूक केली. ही बाब शेतकऱ्याला माहीत झाली. त्यानंतर शेतकरी व्यापाऱ्यावर चांगलाच चिडला. वजनात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याने चांगलाच चोप दिला. त्याचा व्हिडीओ सध्या परिसरात व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओवरून चर्चा सुरू आली. शेतकऱ्यांची फसवणूक कराल, तर अशी अद्दल घडलीचं पाहिजे, असं शेतकरी म्हणू लागले आहेत.
गाडीच्या वजनात हेराफेरी
जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी व्यापाराला चोप दिल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील बोरीस येथे एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला कापूस विकला. मात्र त्याआधी व्यापाऱ्याच्या प्रतिनिधीने ज्या गाडीत कापूस भरायचा होता त्या गाडीच्या वजनात हेराफेरी केली.
तीन क्विंटल दगड भरले होते
ज्यावेळी रिकाम्या गाडीचं वजन करण्यात आलं तेव्हा गाडीमध्ये दोन- तीन क्विंटल दगड भरले होते. शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही पुढे चला गाडी आम्ही घेऊन येतो. गाडीतून दगड फेकण्यात आले. त्यावेळी एका शेतकऱ्याने ते पाहीलं. संबंधित शेताऱ्याला हा सर्व प्रकार सांगितला.
व्यापाऱ्याला दिला चोप
तोपर्यंत गाडीत कापूस भरला गेला होता. वजनात हेराफेरी करून लुबाडणूक करणाऱ्या व्यापारी प्रतिनिधीला संतप्त शेतकऱ्यांनी काठीने चोप दिला. शेतकऱ्यांनी नंतर पोलिसांना बोलावून त्या व्यापारी प्रतिनिधीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
लुटारुंची अद्दल अशीच घडवली पाहिजे
या प्रकरणी सोनगीर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. मात्र शेतकऱ्यांना लुटणाऱ्याला शेतकऱ्यांनी दिलेला चोप सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक शेतकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून, लुटारूंना अशीच अद्दल घडली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
शेतकरी हा काबाडकष्ट करून कापसाचं उत्पादन घेतो. व्यापारी अशी लूट करत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. आता पोलीस त्या व्यापाऱ्याचं काय करतात, हे समजेल.