Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा

कडव्या हिंदुत्वावर स्वार होण्याचा राज ठाकरे यांना फायदा किती होईल, हे लगेच सांगणे अवघड आहे. मात्र, त्यांना सध्या याची जबर किंमत मोजावी लागतेय. एकतर पक्षाकडे चांगले कार्यकर्ते असणे आणि ते टिकवून ठेवणे हे सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे झाले आहे. मात्र, मुंबईसह अठरा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा एकेक शिलेदार गळणे राज ठाकरे यांना चांगले महागात पडू शकते.

भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा
राज ठाकरे आणि साहील खान.
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:35 AM

धुळेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षात तीव्र खदखद व्यक्त होतेय. एकीकडे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (More) यांनी या निर्णायला जाहीर विरोध केलेला असताना आता धुळ्याचे उपमहानगर प्रमुख साहिल खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकेच नाही, तर त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कडव्या हिंदुत्वावर स्वार होण्याचा राज ठाकरे यांना फायदा किती होईल, हे लगेच सांगणे अवघड आहे. मात्र, त्यांना सध्या याची जबर किंमत मोजावी लागतेय. एकतर पक्षाकडे चांगले कार्यकर्ते असणे आणि ते टिकवून ठेवणे हे सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे झाले आहे. मात्र, मुंबईसह अठरा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा एकेक शिलेदार गळणे राज ठाकरे यांना चांगले महागात पडू शकते, अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेले दिसतेय.

कोण आहेत खान?

राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून राजीनामा देणारे साहील खान हे धुळ्याचे उपमहानगर प्रमुख होते. त्यांचे येथील कामही चांगले आहे. त्यांच्यासोबत इतर मुस्लिम कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. खान हे गेल्या सात वर्षांपासून मनसेचे प्रामाणिकपणे काम करत होते. नुकतेच त्यांनी जनसेवेसाठी अडीच लाख रुपये खर्च करून एक ॲम्बुलन्स देखील घेतली होती. त्या ॲम्बुलन्सवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते स्थापन विभाग नाव आणि राज ठाकरे यांचा फोटो लावला होता.

राज टीकेचे धनी

राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. ईडीची एक नोटीस आली आणि राज सुतासारखे सरळ झाले. इतक्या दिवस लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आता तेच राज चक्क मोदींचे गुणगाण करतायत. स्वतः कडवे हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवत आहेत. मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आवाहन करत आहेत. या साऱ्यावरूनही ते टीकेचे धनी होतायत.

राज काय बोलणार?

राज यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावरून घेतलेली सभा आणि कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यातच मंगळवारी (12 एप्रिल) सायंकाळी ठाण्यात त्यांची पुन्हा एकदा झंझावाती सभा होतेय. ते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागलीय. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.