तुम्ही पित असलेले दूध किती सुरक्षित?, या जिल्ह्यात दुधातील भेसळ उघडकीस
दुधाची गुणवत्ता पाहिजे तशी राहत नाही. पण, दुध गाळा दिसावा, यासाठी या क्लुप्त्या केल्या जातात. आपल्याकडे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी आहे.
धुळे : दुधाला पूर्ण अन्न समजले जाते. त्यामुळे बहुतेक सर्व जण दूध पितात. पण, आपल्याला मिळणारे दूध किती सुरक्षित आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. दुधाचे पॅकेट तयार करत असताना त्यात पावडर मिक्स केले जाते. त्यामुळे दुधाची गुणवत्ता पाहिजे तशी राहत नाही. पण, दुध गाळा दिसावा, यासाठी या क्लुप्त्या केल्या जातात. आपल्याकडे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे फावते. फारच कमी ठिकाणी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होते. त्यामुळे आपल्याला मिळणारे दूध बहुतेक वेळा सुरक्षित नसते.
धुळ्यात भेसळयुक्त दुधाच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे ही धडक कारवाई करण्यात आली. दूध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
भेसळ माफियांचे धाबे दणाणले
धुळे जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्याकरिता पोलीस प्रशासन, अन्न आणि औषध प्रशासन तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधावा. संयुक्तिक कार्यवाही केली. दूध भेसळ रोखण्यासंदर्भात नियोजनबध्द आणि गोपनीयतेने कारवाई केली. यामुळे भेसळ माफियाचे धाबे दणाणले आहेत.
फेरीवाल्यांच्या दुधाची तपासणी
धुळे शहरातील साक्री रोड, साक्रीनाका परिसरात दूध वाहतूक, दूध पुरवठा फेरीवाले यांच्याकडील दुधाची तपासणी Milk Lacloscan या स्वयंचलित उपकरणाव्दारे करण्यात आली. दुधातील फॅट आणि एसएनएफची तुलनात्मक पडताळणी करण्यात आली.
भेसळयुक्त दूध नष्ट
या धडक कारवाईमध्ये एकूण 11 दूध विक्रेत्यांच्या दुधाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एकूण 6 दूध विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ आढळली. भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. दूध मोजण्याची मापे यांची पडताळणी करण्यात आली. डेअरीतील मापे ही अवैध स्वरुपाची आढळली. वैध मापन शास्त्र अधिनियम अंतर्गत खटला नोंदविण्यात आला. अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली.