Tv9 Impact | मुख्यमंत्र्यांकडून बातमीची दखल, अखेर धुळे बस स्थानकावर पोटासाठी वणवण फिरणाऱ्या ठगू आजीला मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या बातमीची दखल घेत एका निराधार वृद्ध महिलेला अतिशय मौल्यवान अशी मदत मिळवून दिली आहे. ही वृद्ध महिला धुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून पैसे किंवा अन्न मागवून स्वत:चा उदरनिर्वाह भागवत होती. तिला मुलगा नाही. त्यामुळे तिच्यावर अशी वेळ आली होती. 'टीव्ही 9 मराठी'च्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला या आजीबाईला मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या आजीला तातडीची मदत मिळाली आहे.

Tv9 Impact | मुख्यमंत्र्यांकडून बातमीची दखल, अखेर धुळे बस स्थानकावर पोटासाठी वणवण फिरणाऱ्या ठगू आजीला मदत
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 5:13 PM

मनेश मासोळे, Tv9 मराठी, धुळे | 15 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल घेत एका निराधार आजीला मदत केली आहे. धुळे स्थानकावर एक आजी प्रवाशांकडून पैसे किंवा जेवण मागून आपला उदरनिर्वाह भागवत होती. ही आजी ‘टीव्ही 9 मराठी’च्या निदर्शनास आली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीकडून आजीचा एक व्हिडीओ काढण्यात आला. या व्हिडीओत ठगू आजी अहिराणी भाषेतील जात्यावरची गाणी बोलताना दिसली होती. या व्हिडीओत आजीला तिचं नाव आणि गाव विचारण्यात आलं. तिला शासनाकडून कुठली मदत मिळते का? असं विचारण्यात आलं होतं. आजीने आपल्याला कुणाकडूनही मदत मिळत नसल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अहिराणी मनोरंजनाचं माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवरील ‘खान्देशी किडा’ नावाच्या पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर झाला होता. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

या आजीची व्यथा सांगणारी बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’कडून पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. आजीने ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर आपली व्यथा मांडली. “जोपर्यंत माझ्याकडून काम झालं तोपर्यंत मी काम केलं. आता माझ्याकडून काम होत नाही. मला जितकं काम येतं ते पाहून लोकं कामाला नाही म्हणतात. मी इथेच असते”, असं आजीने ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं. “मी काहीच करत नाही. खाण्यापुरता लोकांकडून मागून घेते आणि त्यानंतर गपचूप इथे बसते”, असं ठगू आजी म्हणाली.

आजीने हंबरडा फोडला

यावेळी ठगू आजीला तुला सरकारकडून काय अपेक्षा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठगू आजीला बोलताना अश्रू अनावर झाले. “मला माझं घर कोरडं करुन द्या. मी इथे येणार नाही. माझं घर पडलं आहे. घरात गुडघ्या इतकी माती आहे. मी पाण्यात झोपते. मला घरकुलमधून घर तरी करुन द्या. मग मी इथे येणार नाही. मला मुलगा असता तर त्याने घर बांधलं असतं. पाण्यात झोपते मी बेटा. मला राहायलादेखील जागा नाही. वाटल्यास तुम्ही माझं घर बघून घ्या. मी जागच्या जागेवर व्याकूळ होते आणि इथे लोकांकडून मागून खाते. इथे असणारी लोकं तुम्हाला सगळं सांगतील”, असं बोलून ठगू आजीने हंबरडा फोडला.

मुख्यमंत्र्यांकडून बातमीची दखल, स्वत: महापालिका आयुक्त आजीच्या भेटीला

‘टीव्ही 9 मराठी’कडून ठगू आजीच्या प्रसारित झालेल्या या बातमीची दखल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने धुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आजीला मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्वत: धुळे महापालिकेच्या आयुक्त्या अनिता पाटील यांनी धुळे बसस्थानक गाठत आजीची भेट घेतली. त्यांनी आजीची विचारपूस केली. तसेच आजीची तात्पुरती व्यवस्था ही धुळ्याच्या निवारा केंद्रात केली. या निवारा केंद्रात आजीला मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आजीच्या घराचा प्रश्नदेखील लवकरच मिटवला जाईल, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

निवारा केंद्रात आजीसाठी सर्व सोयीसुविधा

ठगू आजीला निवारा केंद्रात सर्व व्यवस्था पुरवल्या जाणार आहेत. निवारा केंद्रात आजीची झोपण्याची, राहण्याची आणि खाणे-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजीला आरोग्य सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत. तसेच आजीच्या घराचा प्रश्न देखील येणाऱ्या काळात सुटणार आहे. धुळे निवारा केंद्राच्या केद्र चालकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आजीला देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी सविस्तर माहिती सांगितली.

(आजीची आधीची बातमी : आजीले मदत करा दादा… आजी खरं बोली रायनी, या आजीच्या दारापर्यंत शासन येणार का?)

“आजी बऱ्याच दिवसांपासून धुळे बस स्थानक इथे राहत होती. आमच्या संस्थेचे बरेच जण आजीकडे जावून तिला निवारा केंद्रामध्ये आणण्याचे प्रयत्न करत होते. पण आजी बऱ्याच दिवसांपासून टाळाटाळ करत होती. आयुक्त मॅडम यांनी स्वत: देखल घेतली. संस्थेचे प्रतिनिधी आणि आपल्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधींनी आजींना येथे येण्यासाठी समजूत घातली. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर आम्ही आजींना निवारा केंद्रात आणलं. आमच्या संस्थेकडून आजीची राहण्याची आणि खाण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही आजी आणि इतर निराधार गरजू लोकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतो. आमच्या संस्थेकडून मोफत ही मदत केली जाते”, असं निवारा केंद्राच्या प्रमुखांनी सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.