‘मोदी म्हणाले, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट, अहो, तुमचा बुरशी आलेला माल…’, ठाकरेंची तोफ धुळ्यात बरसली

"मोदी आज तिकडे बोलले की, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे. तो 4 जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेत केला.

'मोदी म्हणाले, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट, अहो, तुमचा बुरशी आलेला माल...', ठाकरेंची तोफ धुळ्यात बरसली
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 7:27 PM

महाविकास आघाडीची आज धुळ्यात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. “धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवलेत? इथे शेतकरी आले आहेत. आलेत की नाही? कांद्याचे शेतकरी किती आहेत? कांदा उत्पादक शेतकरी, तुम्ही आनंदी आहात? निर्यात बंदी वगैरे छान चालू आहे. अजूनही हे निर्लज्ज, निवडणुका आल्या आहेत, माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची निर्यातबंदी उठवत नाहीत. तर गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यातबंदी उठवतात. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात तुम्ही भेदभाव का करतात? महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या दोन वेळेला 40 पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती. या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. माझी तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की, दरवेळेला मला विचारतात, नाना पटोले तुम्हाला विचार असतील की काय होणार? तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? आम्ही 48 च्या 48 जागा जिंकणार. का नाही जिंकायची?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मोदी आज तिकडे बोलले की, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे. तो 4 जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमुत्रधारी, ही अशी घाण लोकं आम्हाला नकोयत. शोभा ताई तुम्ही खासदार म्हणून आम्हाला तिकडे का हव्या आहेत? संविधानाचं रक्षण केलंच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ह्यांना बदलून टाकायचीय’

“ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साध्या, दलित कुटुंबात जन्मात आलेला मुलगा हा एवढा बुद्धिमान कसा असू शकतो, त्याने लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमुत्रधाऱ्यांना आता ओझं व्हायला लागली आहे. अरे त्या दलित माणसाने लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची? म्हणून यांना 400 पार खासदार करुन ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही ह्यांना बदलून टाकायची आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“शोभा ताई तुम्हाला या सर्व घटनांचं रक्षण करावं लागेल. ही सर्व जनता तुम्हाला निवडून देणार आहे. पहिले प्रथम त्या घटनेचं रक्षण करायला तुम्हाला निवडून देणार आहे. दुसरं ते काय निर्मला सीतारमण बोलल्या की, या देशात चार जाती आहेत. महिला, गरीब, शेतकरी आणि युवा. ठीक आहे, शेतकरी इकडे बसला आहे. कांदा निर्यातबंदी तुम्ही अडवली आहे. सोयाबीनला भाव देतायत? कापसाला भाव देतायत? मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो, आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आता कापसाला भाव मिळत होता. तेव्हा तो भाव आतापेक्षा जास्त होता की कमी होता? मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी किंवा शिवसेनेशी केलेली नाही. तर गद्दारी शेतकऱ्यांशी केलेली आहे. गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.