मराठे काय पाकिस्तान, अमेरिकेतून आलेत काय? बच्चू कडू यांचा ओबीसी नेत्यांना सवाल
मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा वादंग निर्माण झाला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून मागच्या दाराने आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यानंतर सरकारमध्ये खडाजंगी झाली आहे. आमदार बच्चू कडू यांनी या वादात उडी घेतली आहे.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा विरुध्द ओबीसी असा वाद सुरु झाला आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात तोफ डागल्याने राज्यातील वातावरण ढवळलं आहे. आज राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत यावरुन जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता या वादात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. मराठे काय पाकिस्तानातून, अमेरिकेतून आलेत काय ? असा सवाल बच्चू कडू यांनी ओबीसी नेत्यांना केला आहे.
मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा वादंग निर्माण झाला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून मागच्या दाराने आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यानंतर महायुतीमध्येच दोन भाग पडले आहेत. यावरून आता प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. मराठा कुणबी नाहीतर कोण ? पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा आलाय का ? मराठा हे कुणबीच आहेत. काही लोक मतांचा हिशेब करुन आपली राजकीय पोळी शेकत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, जुन्या नोंदी मिळत असून त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रं मिळत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
भुजबळ अभ्यासु नेते आहेत, महात्मा फुले यांनी सांगितले आहे की, कुणबी, माळी, मराठा हे भाऊ भाऊ आहेत. त्यांना वेगळे करू नका, अठरा पगड जातीतल सगळे मराठे आहेत. मराठा हे समुहवाचक शब्द आहे, तो कोण्या जातीचा नाही. मराठे कुणबीच आहेत असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
आमदार आहे ते विसरुन जाईन…
दिव्यांगाचा निधी तीन वर्षांपासून खर्च न केल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांनी उमरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. दिव्यांगाचा तीन वर्षांपासून एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी खर्च केलेला नाही. जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेल, यानंतर कमी निधी दिला तर तेथे येऊन वांदा करेल अशीही धमकी त्यांनी दिली. दिव्यांगाच्या निधी वाटप करायला जीवावर येते का ? अन्याय कराल तर माझे काम कसे आहे हे तुम्हाला माहीती आहे. आमदार आहे ते मी विसरुन जाईन गेल्यावर्षीचे 14 लाख आणि या वर्षीचे 10 लाख याचे वाटप करा अशी मागणी त्यांनी केली.