Thackeray Vs Pawar : ‘लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं ते राज ठाकरे यांना दिसलं नाही का?’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्कात केलेल्या भाषणाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी त्यांच्या खास शैलीत खिल्ली उडवली. उत्तर प्रदेशचे कौतुक करताना लखीमपूरमधला हिंसाचार दिसला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्कात केलेल्या भाषणाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी त्यांच्या खास शैलीत खिल्ली उडवली. कालच्या भाषणाने एक गोष्ट चांगली झाली. ते बरेच वर्ष भूमिगत झाले होते. त्यांचा काहीच अंदाड कुणालाच येत नव्हता. पण कालच्या भाषणामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायाल उत्सुक आहेत हे दिसून आलं. त्यांचं वैशिष्ट्ये सांगायचं म्हणजे, ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला. तर उत्तर प्रदेशचे कौतुक करताना लखीमपूरमधला हिंसाचार दिसला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
Published on: Apr 03, 2022 05:32 PM
Latest Videos