Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या सभेला ज्या अटी होत्या, त्याच उद्धव ठाकरेंच्या सभेला लागू होणार का?; दिलीप वळसे पाटील म्हणाले…

Dilip Walse Patil: राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जे नियम आणि अटी लागू केल्या होत्या, त्याच अटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लागू होणार का? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला होता.

Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या सभेला ज्या अटी होत्या, त्याच उद्धव ठाकरेंच्या सभेला लागू होणार का?; दिलीप वळसे पाटील म्हणाले...
गृहमंत्र्यांकडून ‘तारीख’ जाहीर, पोरं खुश Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:58 PM

नांदेड: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची आज बीकेसीवर सभा होत आहे. तब्बल अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, त्याचबरोबर आणखी एक शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या औरंगाबादच्या सभेला ज्या अटी आणि शर्ती लावल्या होत्या, त्याच अटी आणि शर्ती उद्धव ठाकरे यांच्या सभेला लावण्यात आल्या आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरलेले असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जे नियम आणि अटी लागू केल्या होत्या, त्याच अटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लागू होणार का? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला होता. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याही सभेवरही पोलिसांचं लक्ष राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

केतकीवर कारवाई होणार

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट शेअर केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या गोष्टी जाणूनबुजून आणि ठरवून केल्या जात आहेत. याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ते महान लोक आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोडी तरी हिंदुत्वाची जाण असेल तर त्यांनी सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करावी, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. त्यावर मात्र वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही. ते फार महान लोक आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.