AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार, dilip walse patil यांची घोषणा

सौरभ त्रिपाठी प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

VIDEO: केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार, dilip walse patil यांची घोषणा
केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार, dilip walse patil यांची घोषणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:34 PM

मुंबई: सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी या प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. शेलार यांची ही मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मान्य केली असून केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी जाहीर केलं. दरम्यान, केंद्रीय तपास अधिकारी असल्याचं भासवून व्यापाऱ्यांकडून वसुली केल्याप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांना आधीच निलंबित करण्यात आलेलं आहे.

राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले होते. या कारवाईचे स्वागत करताना आशिष शेलार यांनी एका गंभीर बाबीकडे आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले.

अन्य कोणी अधिकारी वसुली करत नाहीत ना?

या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

काय आहे प्रकरण?

ओम वंगाटे या पोलिस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2021 वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलिसांची वागणूक आणि पोलिस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्थानकात न आल्यानं संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: महापालिकेच्या अधिकाऱ्यांची mohit kamboj यांच्या घरी धडक, कंबोज म्हणतात, पालिकेने एक एक इंच जमीन तपासावी

मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; Anil Bonde यांचा घणाघात

Maharashtra News Live Update : दहावी, बारावीप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षाही होणार ऑफलाईन ; लवकरच जाहीर होणार निणर्य?

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....