Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिना 2020 मध्ये 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र खळबळ माजली. दिशाच्या मृत्यूनंतर 14 जून 2020 मध्ये सुशांत याने देखील स्वतःला संपवलं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहन राय याने मोठा खुलासा केला होता. दिशाच्या मृत्यू पूर्वी आणि मृत्यूनंतर नक्की काय झालं यावर रोहन याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
रिपोर्टनुसार, दिशा सालियन मॉडेल आणि अभिनेता रोहन राय याच्यासोबत लग्न करणार होती. पण लग्नाच्या काही दिवस आधीच दिशाचा मलाड येथील उच्चभ्रू इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. दरम्यान, दिशाच्या मृत्यूनंतर रोहन याला अनेक धमक्या देखील देण्यात आल्या.
त्या रात्री नक्की काय झालं?
रोहन म्हणाला, ‘दिशा प्रचंड संवेदनशील मुलगी होती. आम्ही दोघे कुटुंबासोबत राहत होतो. 4 जून रोजी मी तिला सांगितलं, की आपण मलाड येथील घरी जाऊ… दिशाला चांगलं वाटावं…म्हणून मी तिला मलाड येथील आमच्या फ्लॉटवर घेवून गेलो. आमच्यासोबत चार मित्र देखील होते. त्यादिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात ड्रिंक केली होती. नंतर मी माझ्या एका मित्रासोबत फोनवर बोलायला गेलो आणि दिशा बेडरुममध्ये गेली.’
ही बातमी सुद्धा वाचा – Disha Salian Case: काय आहे दिशा सालियन प्रकरण? मायानगरीत कसा आला भूकंप, आदित्य ठाकरे का हैराण? वाचा A टू Z
‘खूप वेळ लोटल्यानंतर देखील ती परत आली नाही. त्यामुळे आम्ही तिला शोधू लागलो. तेव्हा मी पाहिलं बेडरुमची खिडकी उघडी होती. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर मला तिचे कपडे दिसले. मी पूर्णपणे घाबरलेलो… मी देखील स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ती रात्र एका वाईट स्वप्नासारखी होती. दिशा आणि मी जवळपास 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो…’ असं देखील रोहन म्हणाला.
दिशाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक धमक्या येवू लागल्या. लोकं मला शिव्या देऊ लागले. दिशाच्या आत्महत्येच्यानंतर आमच्यात काही भांडण झालं होतं का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी माझे कपडेही काढायला लावले… असं देखील रोहन राय म्हणाला होता. आता दिशा सानियल मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.