‘रात्रीस खेळ चाले’, नाशिक पूर्व मतदासंघात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. प्रचार बंद झाल्यानंतर अशाप्रकारचा राडा होणं अपेक्षित नाही. पण तरीदेखील अशाप्रकारची घटना समोर आली आहे. नाशिक पूर्वेत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

'रात्रीस खेळ चाले', नाशिक पूर्व मतदासंघात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने
नाशिक पूर्व मतदासंघात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:36 PM

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैसे वाटप सुरु असल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याची गाडी फोडली आहे. गणेश गिते हे पैसे वाटतात, असा भाजपचा आरोप आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीदेखील नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती. दरम्यान, आजच्या घटनेवेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. दोन दिवसांपूर्वी देखील असाच राडा झाला होता. फक्त त्यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तो वाद देखील मतदान स्लिपांच्या वाटपावरुन वाद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा तसाच राडा झाला. मतदानाच्या स्लिप वाटत असताना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. यातून मोठा वाद झाला. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.

खरंतर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. प्रचार बंद झाल्यानंतर अशाप्रकारचा राडा होणं अपेक्षित नाही. पण तरीदेखील अशाप्रकारची घटना समोर आली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार राहुल ढिकाले विरुद्ध ठाकरे गटाचे गणेश गिते अशी लढत आहे. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जातोय.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुखांवर हल्ला

दरम्यान, नाशिक पूर्वच्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच नागपुरातून मोठी बातमी समोर आली. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. अनिल देशमुख ही निवडणुकीची सांगता सभा आटोपून काटोलच्या दिशेला जात असताना एका चौकावर त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भाजप आमदाराच्या बहिणीवर दगडफेक

विशेष म्हणजे अमरावती येथून देखील धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावतीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजप आमदाराच्या बहीणीच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सातेफळ फाट्यावरुन असताना प्रताप अडसड यांच्या बहिणीच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत.

गंगापुरात अपक्ष उमेदवारावर जीवघेणा हल्ला

गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. अज्ञात आरोपींनी दगडफेक करत गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश सोनवणे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगापूर तालुक्यातील लांजी परिसरात झाला सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.