2 जागांवरुन मविआत बिघाडी? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप समोर आलेला नाही. दुसरीकडे पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. असं असताना महाविकास आघाडीत दोन जागांवर वाद निर्माण झाल्याचं सध्याचं चित्र आहे.

2 जागांवरुन मविआत बिघाडी? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 11:29 PM

मुंबई : महाविकास आघाडीचं जागावाटप अजून बाकी आहे. पण त्याआधीच कुरबुरी सुरु झाल्या आहेत. राज्यातल्या दोन जागांवरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. एक जागा महाड विधानसभेची आहे. तर दुसरी जागा सोलापूर लोकसभेची आहे. माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आक्षेप घेतलाय. महाडची जागा ही काँग्रेसच लढेल असं नाना पटोलेंनी जाहीरपणे सांगितलंय.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदारसंघातून भरत गोगावले हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. भरत गोगावलेंना 1 लाख 2 हजार 273 मतं मिळाली. काँग्रेसच्या माणिकराव जगताप यांना 80 हजार 698 मतं मिळाली. 21 हजार 575 मतांनी भरत गोगावले विजयी झाले. मधल्या काळात माणिकराव जगताप यांचं निधन झालं.

माणिकराव जगतापांच्या कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्ष होत्या. शिवसेनेत बंड झाल्यानंतर भरत गोगावले हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळं उद्धव ठाकरेंची शिवसेना ही उमेदवाराच्या शोधात होती. अखेर ठाकरेंनी स्नेहल जगताप यांना काँग्रेसमधून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आणलं. त्यामुळं आता महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप यांच्यात निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. स्नेहल जगताप ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर काँग्रेसनं यावर तीव्र आक्षेप घेतला.

हे सुद्धा वाचा

सोलापुरातही मविआत वाद

महाविकास आघाडीत सोलापूर लोकसभेच्या जागेरुनही जाहीर वाद सुरु झालाय. हा वाद राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छेडलाय. सोलापुरात भाकरी फिरवण्याची वेळ आलीय असं जाहीर वक्तव्य काल रोहित पवारांनी केलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.

जयसिद्धेश्वर स्वामींना 5 लाख 24 हजार 985 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना 3 लाख 66 हजार 377 मतांवर समाधान मानावं लागलं. 1 लाख 58 हजार 608 मतांनी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला.

सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. यातल्या मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने हे आमदार आहेत. माजी आमदार राजन पाटलांची त्यांना खंबीर साथ आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे विजय देशमुख हे आमदार आहेत. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत.

सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याणशेट्टी, तर पंढरपूरमध्ये भाजपचेच समाधान औताडे हे आमदार आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळंच की काय.. राष्ट्रवादीनं याआधीही या जागेवर दावा केला होता. रोहित पवार आणि प्रणिती शिंदेंमध्ये त्यावेळी चांगलीच जुंपली होती.

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. पण तिन्हीही पक्षांमध्ये जागावाटपाची कुठलीही चर्चा झालेली नाही. त्याआधीच दोन जागांवरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.