Special Report | मुख्यमंत्र्यांचं शहर, वादाचं घर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर असलेल्या ठाण्यात गेल्या आठवड्यापासून तब्बल चार मोठे वाद झालेत.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर असलेल्या ठाण्यात गेल्या आठवड्यापासून तब्बल चार मोठे वाद झालेत. जितेंद्र आव्हाड यांच्या वादानंतर ठाण्यात शिवनसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले. ठाण्यातील किसननगरमध्ये ठाकरे गटाकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिंदे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी घोषणबाजी सुरु केली. त्यामुळे मोठा वाद उफाळला आणि गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे या हाणामारीच्या वेळी खासदार राजन विचारेही तिथेच उपस्थित होते. या घटनेविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !