महायुतीत अजित दादा आणि भुजबळांवरुन वाद टोकाला? पडद्यामागे काय घडतंय?

लोकसभेच्या पराभवावरुन भाजप आणि संघाच्या बैठकीत पुन्हा अजित पवारांवरच खापर फोडण्यात आलं. तर आता शिंदेंच्या शिवसेनेनं भुजबळांवर थेट निशाणा साधलाय. भुजबळांमुळे महायुतीत चलबिचल सुरु झाल्याचं शिंदे गटाने म्हटलं आहे.

महायुतीत अजित दादा आणि भुजबळांवरुन वाद टोकाला? पडद्यामागे काय घडतंय?
अजित पवार आणि छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 9:05 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे 2 नेते संघ-भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर नंतर, आता भाजप आणि संघाच्या बैठकीतही अजित पवारांवर पुन्हा एकदा लोकसभेच्या पराभवाचं खापर फोडण्यात आलंय. पुण्यात संघ आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. या बैठकीतून, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर व्यक्त करण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सोबत होते मात्र कार्यकर्ते नव्हते, असं भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नाही, असं मत भाजप आमदारांनी व्यक्त केलं. माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ लोकसभेत अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराला फटका बसल्याचं चित्र आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात खेडमधून दिलीप मोहिते पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावातून दिलीप वळसे, आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे 4 आमदार असतानाही अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे आढळराव पाटील पराभतू झाल्यानं भाजपनं नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आल्याचं कळतंय.

रुपाली ठोंबरेंचा भाजपवरच अटॅक

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासजार सुनील तटकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाकडून अशी कोणतीही प्रतिक्रिया नसल्याचं म्हटलं. पण राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी मात्र भाजपवरच अटॅक केला. भाजपवरीलच नाराजीचा फटका अजित पवारांना बसला असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत. काही दिवसांआधीच, संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांमुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं म्हटलं. आता संघासोबतच्या बैठकीतूनही अजित पवार विरोधी सूर उमटल्याचं समजतंय. इकडे बच्चू कडूंनीही भाजपवरच निशाणा साधत, अजित पवारांना नाक दाबून बुक्क्यांचा मार दिला जात असून, एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठीच दादांना घेतलं, असा निशाणा साधला.

छगन भुजबळांच्या भूमिकांवर शिवसेना आक्रमक

विशेष म्हणजेच अजित पवारांवर भाजप आणि संघाची नाराजी असल्याच्या बातम्या येत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या भूमिकांमुळं शिंदेंची शिवसेना आता भुजबळांविरोधात उघडपणे बोलतेय. भुजबळ सध्या उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असून त्यांच्यामुळं महायुतीत चलबिचल असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविषयी सहानुभूतीचं वक्तव्य, लोकसभेसाठी भाजपनं नाव निश्चित केल्यावरही नाशिकची जागा शिंदे गटानं न सोडल्याचा सूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरवरुन वाद झाला असताना आव्हाडांच्या बाजूनं उभं राहणं अशा वक्तव्यांमुळं भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत बहुमत असतानाही अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती? असा थेट सवाल संघानं मुखपत्रातून विचारला होता. आता भाजप- संघाच्या बैठकीतून अजित पवारांच्या विरोधात सूर कायम आहे. तर भुजबळांकडे शिंदे गटानं मोर्चा वळवलाय. त्यामुळे आता आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.