घाबरु नका, लॉकडाऊनमध्ये किराणा आणि मेडिकल उघडी राहणार : नवाब मलिक

महाराष्ट्रात रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने आणि मेडिकल उघडी राहतील त्यामुळे जनतेने घाबरुन जाऊ नका, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on Lock Down) यांनी केलं आहे.

घाबरु नका, लॉकडाऊनमध्ये किराणा आणि मेडिकल उघडी राहणार : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 10:05 PM

मुंबई : महाराष्ट्रात रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने आणि मेडिकल उघडी राहतील त्यामुळे जनतेने घाबरुन जाऊ नका, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on Lock Down) यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरंसिंहगद्वारे देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली (Nawab Malik on Lock Down).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अनेक अन्नधान्यांच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, कुणीही घाबरु नका. महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु राहतील, सर्व सामान मिळेल, असं नवाब मलिक म्हणाले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Announced Lock down)  यांनी देशभरात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन होत आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (PM Narendra Modi Announced Lock down) .

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे

संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन, पंतप्रधान मोदींनी मोठं हत्यार उपसलं, देशभरात कर्फ्यू, जनता कर्फ्यूचं पुढचं पाऊल, आज रात्री १२ पासून अंमलबजावणी, २१ दिवस घरबाहेर पडण्यास मज्जाव

देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू करतोय, जिथे आहात तिथेच राहा, पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतोय, मोदींचं आवाहन, प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, शहर, गावं लॉकडाऊन

लक्ष्मण रेखा आखून घ्या, रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल, पंतप्रधान मोदींचा इशारा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन गरजेची

काहीही होऊ दे घराबाहेर पडायचंच नाही, देशवासियांनी निर्धार करण्याचा मोदींचा सल्ला, जगाला हैराण केलेल्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मोदींचा मंत्रा

‘जान है तो जहान है’, स्वत: बाहेर पडून इतरांना धोक्यात घालू नका, मोदींची विनंती, महामारीपासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम

चीन, इटली, जर्मनी, अमेरिका यांची आरोग्य यंत्रणा उत्तम, तरीही तिथली परिस्थिती भीषण, मोठं संकट टाळण्यासाठी घरातून बाहेरच पडू नका, मोदींचं आवाहन

कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज, पंतप्रधान मोदींकडून घोषणा, व्हेंटिलेटर, मास्क, अन्य साधनं वाढवण्यावर भर

अफवा आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचं पालन करा, मोदींचा सल्ला

21 दिवसांचा लॉक डाऊन मोठा काळ, मात्र तुमच्या आणि कुटुंबीयांच्या स्वास्थ्यासाठी हा निर्णय आवश्यक, प्रत्येक हिंदुस्थानी नेटाने लढेल, मोदींना विश्वास

संबंधित बातम्या :

भारताला वाचवण्यासाठी आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.