नंदी नसलेलं महादेव मंदिर कुठे आहे माहितीय का? त्या मागील आख्यायिका सुद्धा जाणून घ्या…
हजारो वर्षे जून असलेले या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे मोठी गर्दी पाहायला मिळत असते. खरंतर नाशिक शहराला मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
नाशिक : आज महाशिवरात्र ( Mahashivratri ) आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवभक्त हे महादेवाच्या दर्शनाला जात असतात. महादेवाचे दर्शन घेण्या अगोदर प्रत्येक मंदिरात तुम्हाला सुरुवातीला नदीचे दर्शन घेऊनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाता येते. शिवलिंगाच्या दर्शनाआधी नंदीचे दर्शन घेण्याची खरंतर जुनी परंपरा आहे. पण संपूर्ण जगभरात प्राचीन असं एक मंदिर आहे जिथे महादेवाच्या मंदिरात नंदी नाहीये. इतर प्रत्येक मंदिरात तुम्हाला नंदी आवश्य दिसेल पण नाशिकच्या रामकुंडाच्या ( Nashik Ramkund ) समोरील बाजूस कपालेश्वर असे एकमेव मंदिर आहे तिथे नंदी नाहीये.
हजारो वर्षे जून असलेले या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे मोठी गर्दी पाहायला मिळत असते. खरंतर नाशिक शहराला मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
मंदिराच्या शहरात महादेवाची विविध मंदिरे आहेत. त्याच्या वेगवेगळ्या आख्यायिका देखील सांगितल्या जातात. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे कपालेश्वर मंदिर. नंदी नसलेलं मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे.
कपालेश्वर मंदिर तसे सातशे वर्षांपासूनचे असल्याचे सांगितले जाते. पद्मपुराणात या मंदिराच्या बाबतच्या अनेक आख्यायिका सांगितल्या आहे. त्यापैकीच एक नंदीच्या बाबतची आहे. या मंदिरात नंदी का नाही यामागे कारण काय आहे हे त्यात नमूद केलं आहे.
पद्मपुराणानुसार शिव शंकराला ब्रम्ह हत्येचं पातक लागलं होतं, त्यावेळी त्यांनी तिन्ही खंडात फिरून आल्यानंतरही त्यांना त्यातून सुटका होत नव्हती, त्यांना त्याबाबतचे प्रायश्चित मिळत नव्हते. त्यावेळी नंदीने महादेवला सांगितले होते.
महादेवा तुम्हाला हे प्रायश्चित अरुणा आणि वरूणा या नदीचा जिथे संगम होतो त्या प्रवित्र स्थळी जाऊन स्नान करावे लागेल. त्यानुसार ब्रम्ह हत्येचे पातक दुर निघून जाईल आणि नष्ट होईल. त्यानुसार महादेवाने नंदीचे ऐकले होते.
त्यानंतर महादेवाने नंदीच्या ऐकण्याने महादेवाचे पातक नाहीसे झाले. त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात तसे इथे माझ्यासोबत नसावे असे म्हंटले होते. त्यानंतर नंदीने त्यांची विनंती मान्य केल्याची पद्मपुराणात सांगितले आहे.
तेव्हापासून नाशिकच्या कपालेश्वरमंदिरात नंदी नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे जगभरात प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती दिसते, फक्त एकमेवे नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दिसत नाही.
महादेवाने नंदीला गुरु तेव्हापासून मानल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात स्नान केल्याने पातक दुर होतं अशी धारणा अनेकांच्या मनात असते त्यामुळे रामकुंडावर अनेक जण स्नान करणेसाठी येत असतात.
नाशिकच्या कपालेश्वर मंदिराला मोठा वारसा लाभलेला आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर जितकं पुण्य मिळतं तितकंचं पुण्य कपालेश्वर मंदिरात घेतल्यावर मिळतं असंही सांगितलं जातं.
त्यामुळे महाशिवरात्रीला अनेक भाविक हे आवर्जून नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या कपाळेश्वर मंदिरात दर्शनाला येत असतात. त्यात या मंदिराला वेगळा इतिहास असल्याने अनेक पर्यटनाला आल्यावर आवर्जून भेट देत असतात.