पाच महिलांना शस्त्रक्रियेसाठी भूलचे इंजेक्शन दिले, चहा न मिळाल्याने डॉक्टर निघून गेले, आता…

tea and doctor | चहा अनेकांचे आवडे पेय आहे. यामुळे पुणेकरांनी चहाला अमृततुल्याचा दर्जा दिला आहे. चहाची तल्लफ अनेकांना असते. वेळेत चहा न मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील एका डॉक्टराने शस्त्रक्रिया सोडली. आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेने डॉक्टरास नोटीस बजावली आहे.

पाच महिलांना शस्त्रक्रियेसाठी भूलचे इंजेक्शन दिले, चहा न मिळाल्याने डॉक्टर निघून गेले, आता...
teaImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 9:27 AM

गजानन उमाटे, नागपूर | 11 नोव्हेंबर 2023 : पाऊस असो की गुलाबी थंडी वातावरण कसे असले तरी अनेकांना चहा हवा असतो. कधी झोप येत असेल झोप मोडण्यासाठी चहा घेतला जातो. कधी तणाव घालवण्यासाठी चहा घेतला जातो. कधी अभ्यासासाठी जागायचे म्हणून चहा घेतला जाता. यामुळे चहाचे स्टॉल शहर किंवा गावातील गल्लीबोळात दिसतात. चहाची तल्लफ किती धोकायदायक आहे, हे एका डॉक्टराने नागपूर जिल्ह्यात दाखवून दिले. या डॉक्टराने चहा मिळाला नाही म्हणून चार महिनांना भूल देऊन शस्त्रक्रिया करणे सोडून दिले. नागपूर जिल्ह्यात झालेल्या या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आता डॉक्टराला नोटीस बजावली आहे.

नेमके काय होते प्रकरण

नागपूर जिल्ह्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. डॉ. तेजराम भलावे हे नऊ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणार होते. डॉ. भलावी यांनी नऊ पैकी पाच शस्त्रक्रिया केल्या. चार महिलांच्या शस्त्रक्रिया बाकी होत्या. त्यावेळी त्यांना चहा अन् बिस्कीट हवे होते. चहा न मिळाल्यामुळे त्यांनी चार महिलांची शस्त्रक्रिया न करता काढता पाय घेतला गेला. विशेष म्हणजे या चार महिलांना भूलचे इंजेक्शन त्यांनी दिले होते. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर तातडीने दुसरा डॉक्टरांना पाठवण्यात आले. त्यानंतर चार महिलांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.

हे सुद्धा वाचा

आता डॉक्टर भलावी यांना बजावली नोटीस

चहा दिला नाही म्हणून अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडणाऱ्या डॉक्टर भलावी यांना नोटीस बजावली आहे. नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी नोटीस बजावली आहे. कुटुंबनियोजन शस्रक्रिया अर्ध्यावर का सोडल्या? याबाबत खुलासा करण्याचे आदेश नोटीसमधून दिला आहे. भूल दिलेल्या चार महिलांच्या शस्रक्रिया सोडून डॅाक्टर गेल्याची बातमी ‘टीव्ही ९ मराठी’ने दाखवली होती. त्याची दखल घेत ही नोटीस दिली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन देऊन चहा न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉक्टरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.