रुग्ण दगावला, नातेवाईकांची पोलिसात तक्रार, पाच जणांवर गुन्हे दाखल, डॉक्टरांचं थेट कामबंद आंदोलन

राज्यात कोरोनाने कहर केलाय. या कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत (Doctor and Nursed strike after case file against him in Islamapur)

रुग्ण दगावला, नातेवाईकांची पोलिसात तक्रार, पाच जणांवर गुन्हे दाखल, डॉक्टरांचं थेट कामबंद आंदोलन
रुग्ण दगावला, नातेवाईकांची पोलिसात तक्रार, पाच जणांवर गुन्हे दाखल, डॉक्टरांचं थेट कामबंद आंदोलन
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 4:24 PM

सांगली : राज्यात कोरोनाने कहर केलाय. या कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. मात्र, काही ठिकाणी डॉक्टरांचा माजोरडापणा देखील बघायला मिळत आहे. काही डॉक्टर अव्वाच्या सव्वा रुपये चार्जेस लावून रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत आहेत. तर काही हॉस्पिटल रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. या साऱ्या घडामोडी ताज्या असताना सांगलीच्या इस्लामपूर येथील एक बातमी समोर आली आहे (Doctor and Nursed strike after case file against him in Islamapur).

नेमकं प्रकरण काय?

रुग्णालयातील पाच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने सर्व रुग्णालयातील स्टाफ, डॉक्टर, नर्सेस संपावर गेले आहेत. रुग्णालयात एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण दाखल असताना डॉक्टरांनी गुन्हा दाखल असल्याने थेट कामबंद आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय (Doctor and Nursed strike after case file against him in Islamapur).

इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण कोरोनाने दगावला होता. यावेळी रुग्णालयाचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात वाद झाला होता. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रुग्णालयातील पाच डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, यावर रुग्णालयातील डॉक्टरांचा आक्षेप आहे. कोणतीही चौकशी न करता केवळ राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यात आले, अशी डॉक्टरांची भूमिका आहे.

‘गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार’

रुग्णांसाठी जीव धोक्यात टाकून दिवसरात्र मेहनत करत असताना पोलिसांनी दुसरी बाजू जाणून न घेता गुन्हा दाखल केल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रकाश रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर आणि नर्सेसने कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप करत सर्व डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने कोरोना रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत गुन्हे मागे घेतली जात नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हेही वाचा : कोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.