Dombivali Assembly election : भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांना कोण देणार तगडं आव्हान

Dombivali Elections 2024 : डोबिवली हा २००९ पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून गेल्या तीन वेळेस भाजपचे रवींद्र चव्हाण निवडून आले आहेत. भाजपकडून ते चौथ्यांदा रिंगणात आहे. रवींद्र चव्हाण यांची या मतदासंघावर मजबूत पकड आहे. सर्व समाजातील लोकांसोबत त्यांचं चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांना कोण तगडं आव्हान देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Dombivali Assembly election : भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांना कोण देणार तगडं आव्हान
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 5:43 PM

Dombivli Assembly Constituency : २००८ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. २००९ पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण येथून प्रतिनिधित्व करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघावर आरएसएसची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपच्या जवळचा मतदार या मतदारसंघात भाजपला मतदान करतो. या मतदारसंघात कोकणी लोकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर गुजरात, मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकं आहेत. हे देखील भाजपला मतदान करतात.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात अनेक जण उभे होते. पण २०१९ मध्येही भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे आणि आता चौथ्यांदा ते रिंगणात आहेत. डोंबिवलीत अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे यंदा त्यांना काहीसा फटका बसू शकतो. पण तरी देखील महाविकासआघाडीला उमेदवाराला येथे टफ फाईट देण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

महाविकास आघाडीकडून दीपेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच कठीण आहे. कारण त्यांच्यासमोर भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं तगडं आव्हान आहे. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्यात जर सुरुंग लावायचा असेल तर महाविकास आघाडीला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना मनसेचे श्रीकांत हळबे यांनी चांगली टक्कर दिली होती. श्रीकांत हळबे यांना ४१ हजार ३११ मते तर रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती. पण यंदा मनसेने येथे आपला उमेदवार दिलेला नाही.

डोंबिवलीत मनसेच्या मतदारांची संख्या देखील भरपूर आहे. त्यामुळे मनसे नेते डोंबिवलीत ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांना मतदान न करण्याचं आवाहन करत आहेत. पण यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात समीकरणं बदलू शकतात. कारण मनसेचे आमदार राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. मनसेने डोंबिवलीत तसाही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मनसेने येथे रवींद्र चव्हाण यांना मदत केली तर भाजप देखील कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला मदत करु शकते. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाने नेते सावध झाले आहेत.

२०१९ मध्ये कल्याण ग्रामीणमधील विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी बदलून शिवसेनेने रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. कारण सुभाष भोईर यांना श्रीकांत शिंदे यांचा विरोध होता. भोईर यांची उमेदवारी बदलली राजकीय समिकरण राजू पाटील यांच्या बाजूने बदलले. २७ गावं आणि आगरी नेते हे यांचा देखील पाठिंबा रवींद्र चव्हाण यांना मिळू शकतो. मनसेने डोंबिवलीत उमेदवार न देता त्याचे संकेत आधीच दिले आहेत.

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे यांचे एकेकाळचे समर्थक दिपेश म्हात्रे रिंगणात आहेत. दिपेश म्हात्रे यांच्या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेकडून प्रल्हाद म्हात्रे हे इच्छुक होते. म्हात्रे यांना मानणारा मोठा मतदार डोंबिवलीत आहे. मनसेने येथे उमेदवार न देता केलेल्या मदतीची परतफेड कल्याण ग्रामीण मध्ये होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचा शिंदे पिता-पुत्रांंना विरोध आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात किती मतदार?

२०१९ च्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात ३ लाख ३८ हजार ३३० मतदार आहेत. ज्यामध्ये १ लाख ७४ हजार ५४४ पुरुष मतदार आणि १ लाख ६३ हजार ७३४ महिला मतदार आहेत.

२०१९ चा निकाल

उमेदवार पक्ष मतदान
चव्हाण रवींद्र दत्तात्रय भाजपा 86,227
मंदार श्रीकांत हळबे मनसे 44,916
राधािका मिलिंद गुप्ते (केतकर) काँग्रेस 6,613
नोटा इतर 4,134
दामोदर ज्ञानबा काकडे इतर 2,311

२०१४ चा निकाल

उमेदवार पक्ष मतदान
चव्हाण रवींद्र दत्तात्रय भाजपा 83,872
दीपेश पुंडलिक म्हात्रे शिवसेना 37,647
हरिश्चंद्र काखारू पाटील मनसे 11,978
केन संतोष अर्जुन काँग्रेस 7,048
विकास गजानन म्हात्रे राष्ट्रवादी कॉंग्रेस 6,346

२००९ चा निकाल

उमेदवार पक्ष मतदान
चव्हाण रवींद्र दत्तात्रय भाजपा 61,104
राजेश शांताराम कदम मनसे 48,777
शंकरलाल मोतीलाल पटेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 9,064
कॉमरेड कलू कोमासस्कर इतर 4,607
मंगला दीपक सुले इतर 2,450
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.