नाल्यातील गाळ रस्त्यावर, वाहतुकीत अडथळे, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, डोंबिवली एमआयडीसी भागातील प्रकार
डोंबिवली एमआयडीसी निवासी, वंदेमातरम् उद्यान जवळील नाल्यातील गाळ चार दिवसांपूर्वी काढण्यात आला. ठेकेदाराने हा गाळ रस्त्याच्या कडेला न ठेवता भर रस्त्यात टाकला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. रिक्षा मोठी वाहने जावूच शकत नव्हती तर पादचारी दुचाकी स्वार तारेवरची कसरत करत या ठिकाणाहून ये जा करत होते.
डोंबिवली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने नालेसफाईची कामे सुरू केली आहेत . डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC) निवासी भागात देखील महापालिकेकडून (KDMC) नालेसफाईचे काम सुरू आहे एमआयडीसी मधील वंदे मातरम उद्यानाजवळील नाल्यातील गाळ सबंधित ठेकेदाराने शेजारील सर्व्हिस रोडवर टाकल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली होती ,तीन दिवस हा गाळ न उचलल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती .याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला तर केडीएमसीने गाळ उचलण्यासाठी ठेकेदाराला ताकीद दिली असून त्याने 24 तासात गाळ उचलला नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 3 कोटी 50 लाख निधीच्या खर्चातून नालेसफाईची कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या पार्शवभूमीवर प्रशासनाने कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.पावसाळा तोंडावर आला असून नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून नाल्यातील गाळ काढून काठावर ठेवला जात असून हा गाळ सुकल्यांनतर उचलला जातो. मात्र अनेकदा अनेकदा हा वेळेत गाळ उचलला जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. डोंबिवली एमआयडीसी निवासी, वंदेमातरम् उद्यान जवळील नाल्यातील गाळ चार दिवसांपूर्वी काढण्यात आला. ठेकेदाराने हा गाळ रस्त्याच्या कडेला न ठेवता भर रस्त्यात टाकला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. रिक्षा मोठी वाहने जावूच शकत नव्हती तर पादचारी दुचाकी स्वार तारेवरची कसरत करत या ठिकाणाहून ये जा करत होते. या गाळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती .वारंवार तक्रार करूनही केडीएमसीने कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आज सायंकाळच्या सुमारास केडीएमसी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत संबंधित ठेकेदाराला तातडीने गाळ उचलण्याच्या सूचना केल्या आहेत येत्या 24 तासात गाळ उचलला नाही तर ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे केडीएमसीचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले.