AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर मार्केटिंगचा अभ्यासासाठी आलेल्यांना 10 टक्के व्याज परताव्याचे आमिष, तब्बल 1 कोटी 23 लाखांची फसवणूक, डोंबिवलीत नवा घोटाळा उघड

डोंबिवलीत "ग्रोथअप इंडिया" आणि "अर्थयुक्ती कन्सल्टिंग" नावाच्या कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये उच्च परतावा मिळेल असे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक फरार आहे

शेअर मार्केटिंगचा अभ्यासासाठी आलेल्यांना 10 टक्के व्याज परताव्याचे आमिष, तब्बल 1 कोटी 23 लाखांची फसवणूक, डोंबिवलीत नवा घोटाळा उघड
share market cheat
Follow us
| Updated on: Apr 06, 2025 | 7:51 AM

टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबिवलीत आणखी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली आहे. ‘शेअर मार्केट’मध्ये मोठा परतावा देतो म्हणत ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी मोहन सावंत यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलीच्या वर्गमित्र अनिकेत मुजुमदार याने त्यांची ओळख संदेश जोशी या व्यक्तीशी करून दिली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा मिळतो, असे सांगून दोघांनी मिळून ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’ या क्लासेसच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. डोंबिवलीतील ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे विश्वास संपादन करण्यात यायचे. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जायची.

मोहन सावंत यांनी यात 10 लाख रुपये गुंतवले. त्यावर त्यांना 1.30 लाख रुपये परत मिळाले, उर्वरित रक्कम आणि परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर पैसे मागितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावले. पोलिसांमध्ये ओळख असल्याचे सांगत तक्रार करू नये, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर मोहन सावंत यांनी या कंपनीची चौकशी केली असता त्याने अशाचप्रकारे आठ ते नऊ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. यानंतर सावंत यांनी सर्वच गुंतवणूकदारांना आपल्यासोबत घेत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

दोन आरोपी ताब्यात

या तक्रारीत गुंतवणूकदारांमध्ये अजित तोडकर, अमित गुप्ता, दिलीप बांभनिया, निकिता गाला, प्रणव जोशी, सुशमा साळवी, संकेत तळेकर आणि तान्हाजी पिचड यांचा समावेश आहे. या सर्वांची एकत्रित 1.23 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणात शेकडो लोकांची फसवणूक करत करोडो रुपयाची फसवणूक झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी 8 ते 9 जणांच्या तक्रारीवरुन विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला कडक कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या मते या फसवणुकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांनी अशाप्रकारे शेअर मार्केटिंग, डिजिटल अरेस्ट, जास्त पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच अशाप्रकारे कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले.

भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.