‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, विधानसभा निवडणुकीत अभियान, लागले बॅनर
maharashtra assembly election 2024: गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत मुक्ती पथमार्फत अभियान सुरु केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी स्थापन केलेली मुक्ती पथ ही संस्था आहे. या संस्थेने महिलांना आवाहन केले आहे.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवार प्रचारासाठी आता रात्रंदिवस एक करत आहे. उमदेवारांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज असते. मग कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न सर्वच उमदेवारांकडून होतो. मग चिकन, मटण, दारु…हवे ते कार्यकर्त्यांना मिळत असते. कार्यकर्ते नाराज होऊ नये, यासाठी पाण्यासारखा पैसा उमेदवार खर्च करत असतो. परंतु आता विधानसभा निवडणुकीत अनोखे अभियान सुरु झाले आहे. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, असे अभियान सुरु झाले. त्याचे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात हे अभियान सुरु झाले आहे.
कोणत्या संस्थेचा उपक्रम
गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत मुक्ती पथमार्फत अभियान सुरु केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी स्थापन केलेली मुक्ती पथ ही संस्था आहे. या संस्थेने महिलांना आवाहन केले आहे. त्यासाठी बॅनर लावले आहे. निवडणुकीत जो उमेदवार दारू पाजेल किंवा दारू वाटप करेल त्या उमेदवाराला नक्कीच पाडा, असा आवाहन डॉक्टर अभय बंग यांच्याकडून करण्यात येत आहे.
या ठिकाणी लागले बॅनर
गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीसाठी मुक्ती पथ ही संस्था मोठे कार्य करत आहे. ग्रामीण भागासह सर्वत्र दारु बंदीसाठी जनजागृती आणि समुपदेशनचे काम ही संस्था करते. गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहे. त्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या मतदार संघांचा समावेश आहे. मुक्तीपथ मार्फत अनेक बॅनर लावलेले दिसत आहेत. त्यावर म्हटले आहे की, जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू
निवडणुकीच्या वेळेस दारू वाटप करणाऱ्या उमेदवारांच्या बहिष्कार किंवा निषेध करण्याचे काम मुक्ती पथ संघटना व डॉक्टर अभय बंग करीत असतात. त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही हा उपक्रम सुरु केला आहे.