लांबे 2019मध्ये वक्फ बोर्डावर निवडून आले, सरकारचा संबंध नाही; वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील हवा काढली

वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा धक्कादायक दावा करतानाच या सरकारने चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला.

लांबे 2019मध्ये वक्फ बोर्डावर निवडून आले, सरकारचा संबंध नाही; वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील हवा काढली
लांबे 2019मध्ये वक्फ बोर्डावर निवडून आले, सरकारचा संबंध नाही; वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील हवा काढलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 6:05 PM

मुंबई: वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा धक्कादायक दावा करतानाच या सरकारने चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विधानसभेत व्यक्त केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  (dilip walse patil) यांनी फडणवीस यांच्या या आरोपातील हवाच काढून टाकली. मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक 30 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद (dawood) करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, अशी ग्वाही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.

सना मलिक यांचं ट्विट काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुदस्सीर लांबे यांच्याबाबतचं विधान केल्यानंतर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांनीही ट्विट करून फडणवीस यांचा पर्दाफाश केला आहे. 13 सप्टेंबर 2019मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती झाली होती. फडणवीस यांच्या सरकारनेच ही नियुक्ती केली होती. महाविकास आघाडीचं सरकार त्यानंतर नोव्हेंबर 2019मध्ये आलं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्याक विभागाचं खातं जानेवारी 2020मध्ये आलं, असं सना मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांचा आणि लांबे यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर डी गँगचा नातेवाईक आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत देवेंद्र फडणवीस, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर करून डॉ. लांबे यांची पोलखोल केली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.

अर्शद खान अटकेत आहे. त्याचा मोबाईल जप्त करा. त्यात या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.

संबंधित बातम्या:

मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोर

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.