EXCLUSIVE : कोरोना कधी संपणार? कसा संपणार? काय करावं? अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसेंची सोपी उत्तरं

डॉ. रवी गोडसे ( Dr Ravi Godse ) हे अमेरिकेतल्या पेन्सीलव्हेनियामध्ये ( America Pennsylvania ) कोरोना रुग्णांवर ( Corona ) उपचार करतात. आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भारतीयांना मार्गदर्शन करतात. कोरोनाबद्दलचे अनेक गैरसमज, भीती ते आपल्या व्हिडीओतून दूर करत असतात.

EXCLUSIVE : कोरोना कधी संपणार? कसा संपणार? काय करावं? अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसेंची सोपी उत्तरं
कोरोनाच्या परिस्थितीवर डॉ. रवी गोडसेंची थेट अमेरिकेतून मुलाखत
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 1:36 PM

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाने ( Maharashtra Corona) थैमान घातलं आहे, अशामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त निराशेचं वातावरण दिसतं, रुग्णालयात बेड्स ( Corona Beds ) नाही, रेमडिसिवीरसारख्या ( remdesivir injection ) औषधांची कमतरता आहे, लस मुबलक ( Corona Vaccine ) प्रमाणात मिळत नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी (Maharashtra 15 Days Lockdown) लागू झाली आहे. अशा वातावरणात सोशल मीडियावर ( Social Media ) पॉझिटीव्ह बोलणारं एक व्यक्तीमत्त्व अनेकांना दिलासा देतं. हे व्यक्तीमत्त्व आहे डॉ. रवी गोडसे ( Dr. Ravi Godse ). डॉ. रवी गोडसे हे अमेरिकेतल्या पेन्सीलव्हेनियामध्ये ( America Pennsylvania ) कोरोना रुग्णांवर उपचार करतात. आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भारतीयांना मार्गदर्शन करतात. कोरोनाबद्दलचे अनेक गैरसमज, भीती ते आपल्या व्हिडीओतून दूर करत असतात. हेच पाहता आज आपण डॉ. रवी गोडसेंशी बातचीत केली आहे. ( Exclusive interview with Dr. Ravi Godse from USA on Corona Epidemic Questions )

प्रश्न- अमेरिकेत 2 मोठ्या लाटा येऊन गेल्या आहेत, सगळ्या जगासह भारतात भयाण परिस्थिती आहे, अशामध्ये पॉझिटीव्ह बोलणारं सापडत नाही. तोच पॉझिटीव्हपणा तुम्ही कोरोनाच्या कहरातही लोकांना देत आहात. नेमकी कोरोनाची काय परिस्थिती आहे?

डॉ. रवी गोडसे- अमेरिकेने दुसरी लाट पचवली, महाराष्ट्रही लवकरच ही लाट पचवेल, आता बऱ्याचदा काय होतं, कोविशिल्डची 2 डोस घेतले तरी काहींना कोविड झाला. अशावेळी व्हॉट्सअपपासून ते सोशल मीडियात लस प्रभावी नाही अशा बातम्या येऊ लागतात. मात्र, यातील दुसरी बाजू अशीही आहे, की कुणा एकाला कोविड झाला, त्याने 2 डोस घेतले म्हणून त्याची परिस्थिती गंभीर झाली नाही. ही दुसरी बाजू, जी सकारात्मक आहे, ती कुणी दाखवायला तयार नाही. आता माझे 2 प्रश्न आहेत, ज्या लोकांनी कोविशिल्डची लस घेऊन 22 दिवस होऊन गेले असतील, तर त्या लोकांना जरी कोरोना झाला तर ते गंभीर होतात का? आणि मागील वर्षी ज्या लोकांना कोरोना झाला होता, ते लोकांना पुन्हा कोरोना झाल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागतं का? याचं उत्तर होय असेल तर काही पावलं उचलावी लागतील आणि उत्तर नाही असेल तर ही लाट लवकरच संपेल हे छातीठोकपणे मी तुम्हाला सांगू शकतो.

प्रश्न- कोरोना काळात सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरलंय, त्याच त्याच वाईट बातम्या कानावर पडतात, यानेही काही परिणाम होतो?

डॉ. रवी गोडसे- मला वाटतं की, जसे जुने लोक 24 तासांचा उपवास करतात, तसा या कोरोनाच्या बातम्या न पाहण्याचा उपवास केला पाहिजे.

प्रश्न- अमेरिकेने 2 लाटा येऊनही त्यावर मात केली. त्यात काय वेगळं आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेने काय करावं?

डॉ. रवी गोडसे- अमेरिकेतही फार हाहाकार उडाला होता. 4-4 हजार लोक मरत होते. मात्र, अमेरिकीच्या नागरिकांचं उद्योजक डोकं आहे. आता कुठल्याही आजारावर लस यायला 4 वर्ष लागतात. कारण, रिक्स कुणी घेत नाही. बऱ्याचदा लस वर्षभरानंतर चालली नाही, तर लस बनवणारे उद्योजक रस्त्यावर येतील. अमेरिकेच्या सरकारने सगळ्या लस बनवणाऱ्या संस्थांना पैसा पुरवला. म्हणून वर्षभरात लस तयार झाली. इथं फायझर, मॉर्डर्ना, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, मोनोक्लोनल एन्टीबॉडीज तयार करण्यात आल्या. इतर देशांच्या तुलनेत भारतानेही कोरोना संकटात खूप चांगलं काम केलंय, आता अजून चांगलं काम करणं गरजेचं आहे.

प्रश्न- कोरोनाच्या या लाटेत असं दिसतंय की एका कुटुंबातील सगळेच पॉझिटीव्ह झाले, तरुण वर्गही कोरोनाला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. काय कारणं आहेत यामागे? की जनतेकडून हलगर्जीपणा होत आहे?

डॉ. रवी गोडसे- सगळं ठिक आहे, पण लोकं तरी किती सहन करणार? एप्रिल तेच, मे तेच, जून तेच, शेवटी लोक कंटाळणारच ना. लोकांना किती दोष देणार तुम्ही? आता प्रशासनानं टेस्ट, ट्रेस आणि आयसोलेशन या पर्याय वापरला. पण हा पर्याय काही कामाचा नाही. माझा सल्ला काय असं तुम्ही आता विचारणार, बेस्ट, स्ट्रेस अँड एलिमिनेट हा फॉर्म्युला वापरायला हवा, बेस्ट लस निवडा, तुमचे हॉटस्पॉट शोधून तिथे ती लस पाठवा आणि कोरोनाला संपवा. आता भारतातील निम्मी कोरोना प्रकरण महाराष्ट्रात आहेत, तर भारतातील अर्ध्या लसी महाराष्ट्राला पाठवा. मिझोरम आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना सारखी ट्रिटमेंट देता येणार नाही, तर जिथं कोरोना प्रकरणं जास्त आहेत, म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना केसेस आहेत, तिथं सर्वाधिक लसींचा पुरवठा व्हायला हवा. नागालँडच्या 80 वर्षांच्या आजोबांपेक्षा नागपुरातल्या 20 वर्षाच्या तरुणाला लसीची गरज जास्त असेल. तिथं लस जायला हवी. आता दोनच गोष्टींवर भर द्यायला हवा, पहिले जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस द्यायची, आणि दुसरे जे कोरोनाने बाधित झालेत, त्यांना जीव पणाला लावून बरं करायचं. माझी सरकारला इतकीच विनंती की, महाराष्ट्र सरकारला थेट फायझर आणि मॉर्डनाबरोबर डील करण्याची परवानगी द्यावी. फायझरचे टेस्टिंग भारतात हवं कशाला? कारण, अमेरिकेत हजारो भारतीयांना ही लस दिली गेलीय, 95 टक्के यशस्वी लस आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ती खरेदी करावी, आणि थेट लोकांना द्यावी.

प्रश्न- अमेरिकेत थेट कारमध्ये असणाऱ्यांना रस्त्यावर टोलनाक्यासारखे बुथ उभे करुन लस दिली जातेय. हे इतकं सोपं करुन ठेवलंय अमेरिकेत?

डॉ. रवी गोडसे- आपण बाबूगिरी फार करतो, त्यात आधारकार्ड हवं, कागदपत्र हवी, कशाला हे उद्योगं? जे आहेत त्यांना लस देऊन टाका, अमेरिकेत एक लस घेऊन जाणारी गाडी रस्त्यावरील एका अपघातामुळे ट्रॅफीकमध्ये अडकली, ती पुढं जाऊ शकतं नव्हती, तेव्हा तिथले लोक मास्क घालून उतरले, आणि त्या वाहतूक कोंडीत असणाऱ्या सगळ्यांना लस देऊन टाकली. असा वेगळा विचार हवा. गोष्टी जास्तीत जास्त सोप्या करायला हव्या. काळाबरोबर चालायला हवं, प्रशासनाच्या कचाट्यात कशाला अडकायचं?

प्रश्न- महाराष्ट्रातील ज्या लोकांना आताच कोरोना झालाय, त्यांना तुम्ही काय सांगाल?

डॉ. रवी गोडसे- आता ज्यांच्याकडे पैसा आहे, अशापैकी कुणाला कोरोना झाला, तर तो थेट बेड बूक करतो, कदाचित त्याला वाटत असेल की परिस्थिती बिघडली की परत बेड मिळणार नाही. मात्र, अशा कृतीमुळे बेड्सची संख्या कमी होते, त्यात असाच विचार अनेकांनी केला, तर शेकडो बेड बूक होऊन जातात आणि इथंच बेड्स कमी पडू लागतात. त्यामुळे असं करणं चांगलं नाही. भारतातील मृत्यूदर अत्यंत कमी आहे, त्यामुळे तुम्ही घाबरु नका हेच मी सांगेल.

डॉ. रवी गोडसेंची EXCLUSIVE मुलाखत, पाहा व्हिडीओ- 

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार

लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका; पोलीस महासंचालकांचं नागरिकांना आवाहन

( Exclusive interview with Dr. Ravi Godse from USA on Corona Epidemic Questions )

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.