शीतल आज तू हवी होतीस, डॉ. विकास आमटे यांची भावनिक पोस्ट

"शीतल आज तू हवी होतीस," अशी भावनिक पोस्ट डॉ. विकास आमटे यांनी केली आहे. (Dr. Vikas Baba Amte Birthday Wish Dr. Sheetal Amte)

शीतल आज तू हवी होतीस, डॉ. विकास आमटे यांची भावनिक पोस्ट
डॉ. विकास आमटे आणि डॉ. शीतल आमटे
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 8:01 PM

मुंबई : “शीतल आज तू हवी होतीस,” अशी भावनिक पोस्ट डॉ. विकास आमटे यांनी केली आहे. महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन टोचून डॉ. शीतल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेमुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. (Dr. Vikas Baba Amte Special Birthday Wish To Dr. Sheetal Amte)

डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा आज (26 जानेवारी) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विकास आमटे यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. “आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे विकास आमटे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत त्यांनी शीतल आणि त्यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

शीतल आमटेंची आत्महत्या 

आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 ला आत्महत्या केली. शीतल यांचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले गेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करत मृतदेह शव विच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविला. यानंतर 4 डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याबाबतचा संपूर्ण अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे आनंदवनासह सामाजिक क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला.(Dr. Vikas Baba Amte Special Birthday Wish To Dr. Sheetal Amte)

चंद्रपूर पोलिसांनी डॉ. शीतल यांचे शव आढळलेल्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर डॉ. शीतल यांचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब या गोष्टी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. तसेच घराची झडती घेतेवेळी पोलिसांना घटनास्थळी तुटलेल्या अवस्थेतील सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे या आत्महत्येमागील गूढ वाढले होते.

कोण होत्या शीतल आमटे?

शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.

सध्या त्या आनंदवनला देशातील आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी देखील काम करत होत्या. या अंतर्गत आनंदवनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य अशा अनेक घटकांचा यात विचार करण्यात येत होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी 2016 मध्ये त्यांना ‘यंग ग्लोबल लिटर 2016’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानंतर त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या तज्ज्ञांच्या पॅनलचं सदस्यत्व देखील देण्यात आलं होतं.

शीतल आमटे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेनच्या समन्वयक म्हणूनही काम करत होत्या. त्यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामासाठीच 2016 चा रोटरी व्हॅकेशनल इक्सलन्स पुरस्कारही भेटला होता. त्या इंक फेलोवशिपच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्या एक्स्प्रेस हेल्थ पुरस्कार आणि एक्स्प्रेस हेल्थकेअर पुरस्कार निवड समितीच्याही सदस्य होत्या. लॅन्सेट आयोगाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (दिल्ली) या संस्थेच्या त्या सल्लागार होत्या. (Dr. Vikas Baba Amte Special Birthday Wish To Dr. Sheetal Amte)

संबंधित बातम्या :

Special Story | डॉ. शीतल आमटे आत्महत्या : 30 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत काय काय घडलं? सविस्तर घटनाक्रमाचे 10 मुद्दे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.