नितीन गडकरी यांची घोषणा, देशात या कारला ‘नो एन्ट्री’

driverless cars | केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक यांनी चालक विरहीत कारसंदर्भात आपला सरकारचा अजेंडा स्पष्ट केला. यामुळे भारतात या प्रकारच्या गाड्यांना एन्ट्री नसणार असल्याचे स्पष्ट झाले. चालकविरहीत गाड्या भारतात आल्या म्हणजे ८० लाख लोकांचा रोजगार जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी यांची घोषणा, देशात या कारला 'नो एन्ट्री'
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 3:11 PM

नागपूर, दि.21 डिसेंबर | केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तपणामुळे प्रसिद्ध आहे. ते नेहमी रोखठोक बोलत असतात. आता नितीन गडकरी यांनी परदेशात कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या गाड्यांना भारतात विरोध दर्शवला आहे. आपण मंत्री असेपर्यंत या गाड्या भारतात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या गाड्या भारतात आल्या तर ८० लाख लोकांचा रोजगार जाईल, अशी भीती गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरात आयआयएमतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. भारतात ड्रायव्हरलेस आणि ऑटोनॉमस गाड्यांना परवानगी देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले नितीन गडकरी

कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमधील बदलांवर जोर दिला.देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. त्यात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यामुळे देशाच्या जीडीपीचे 3.8% नुकसान होते. रस्ते अपघातात मृत्यू होणारे 60 टक्के युवावर्ग आहे. या अपघातांसाठी चार कारणे आहेत. एक ऑटोमोबाइल इंजीनिअरिंग, दुसरा रोड इंजीनिअरिंग, तिसरे इंफोर्समेंट आणि एजुकेशन याचा समावेश आहे.लोकांना जागृत करुन 2030 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या 50 टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्याचवेळी इतर तीन मार्गांवर काम सुरु आहे.

हे उपाय गरजेचे

कारमध्ये सहा एअरबॅग बसवणे, रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट कमी करणे तसेच मोटर व्हेकल अधिनियमानुसार दंड वाढवण्याचा समावेश आहे. महामार्गांवर रुग्णवाहिका आणि क्रेन ठेवली आहे. यामुळे गरज पडल्यास त्याचा लागलीच वापर करत येईल. तसेच भारतातील ७० ते ८० लाख लोक चालक म्हणून व्यवसाय करतात. भारतात चालकविरहीत (ड्रॉयव्हरलेस) कार आल्या तर त्यांचा रोजगार जाईल. यामुळे या गाड्यांना परवानगी नसणार आहे.

टेस्लाचे भारतात स्वागत, पण हे चालणार नाही…

टेस्लाचे भारतात स्वागत आहे. परंतु भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरीग करणे स्वीकारता येणार नाही. आम्ही चीनमध्ये निर्मिती करुन भारतात विक्रीसाठी टेस्लाला परवानगी देणार नाही. टेस्लाचे भारतात स्वागत करु, परंतु निर्मिती भारतातच झाली पाहिजे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.