लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा, योजनेचं उद्घाटन, अनिल परबांची घोषणा

तुम्हाला लर्निंग लायसन्सची सुविधा आता घरबसल्या मिळणार आहे. आजच या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलीय.

लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा, योजनेचं उद्घाटन, अनिल परबांची घोषणा
लर्निंग लायसन्स आता घरी मिळवता येणार, अनिल परब यांची घोषणा
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 3:37 PM

मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. (Launching service to get learning license at home, Announcement by Anil Parab)

तुम्हाला लर्निंग लायसन्सची सुविधा आता घरबसल्या मिळणार आहे. आजच या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलीय. त्यामुळे आता लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करुन, तपशील देऊन तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवता येणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता

या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीदेखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

घर बसल्या रिन्यू करा वाहन परवाना (Driving License)

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे (Corona epidemic) लोकांची अनेक कामं लांबणीवर पडली. पण आता सगळं काही पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे आता महत्त्वाची ऑफिसं आणि व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. अशात जर तुम्हाला वाहन परवाना (Driving License) रिन्यू करायचा असेल तर तोदेखील आता सोप्या पद्धतीने करता येणार आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.

कोरोनाचा धोका आणि वाढती लोकांची गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म डाऊनलोड करुन भरावा लागेल आणि मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. इतकंच नाही तर जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए आवश्यक असणार आहे. यामध्ये जुनं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोदेखील अपलोड करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

आता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत

PNB बँकेची जबरदस्त ऑफर, स्वस्तात घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

Launching service to get learning license at home, Announcement by Anil Parab

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.