Vidarbha Rain : गोंदियात पूल तुटल्याने 16 गावातील वाहतूक बंद, बुलडाण्यात नाला वाहून गेला, तर अकोल्यात झेडपी शाळेला गळती

अकोल्यात विद्यार्थ्यांच्या अंगावर छताचे पोपडे पडले. विद्यार्थ्यांचे शिक्षण मृत्यूच्या छायेत सुरू आहे. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिकस्त झाली. वर्ग खोल्यांना गळती लागली.

Vidarbha Rain : गोंदियात पूल तुटल्याने 16 गावातील वाहतूक बंद, बुलडाण्यात नाला वाहून गेला, तर अकोल्यात झेडपी शाळेला गळती
पावसामुळे खजरी ते खोडशिवनी मार्गाचा पूल तुटला
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 5:52 PM

विदर्भात सर्वत्र पावसाची चांगलीच बॅटिंग सुरू आहे. धुवाँधार पावसामुळं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. पूर्व आणि पश्चिम विदर्भातही पावसानं कहर केलाय. गोंदिया जिल्ह्यात पूल तुटल्यानं 16 गावांतील वाहतूक बंद झाली. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातला नाला वाहून गेला. अकोल्यात जिल्हा परिषदेच्या एका शाळेत छत गळू लागल्यानं विद्यार्थी धोकादायक स्थितीत शिक्षण घेत आहेत. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड मार्गातील कुंमरगुंडा गावातील रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रखडलेली रोवणीची (Rovani) कामे आता वेगाने सुरू झाल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

पावसामुळे खजरी ते खोडशिवनी मार्गाचा पूल तुटला

गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिह्यामधील चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सडक अर्जुनी तहसीलमधील खजरी ते खोडशिवनी मार्गावरील सध्या मोठ्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. अतिवृष्टीमुळं 16 गावांतील नागरिक जुन्या पुलावरून वाहतूक करीत असतात. मात्र दोन-तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने जुना पर्यायी पुल पाण्यामुळे वाहून गेला. 16 गावांतील नागरिकांच्या समोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पुलावरून नागरिक जिल्हा संपर्क साधातात. अनेक विद्यार्थी याच पुलावरून शिक्षणासाठी येणे-जाणे करतात. सध्या त्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

बुलडाण्यातही नाला वाहून गेला

बुलढाणा शहरातील मिलिंदनगर आणि सावित्रीबाई फुलेनगर वस्तीमधून जाणाऱ्या नाल्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम पहिल्याच पावसात वाहून गेलंय. त्यामुळे पावसाने नगर परिषदेचे पितळ उघडे केले आहे. भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. जवळपास 40 लाख रुपये किमतीच्या या नाल्याचे बांधकाम नगरपालिकेच्या निधीतून ठेकेदाराने 8 दिवसांपूर्वीच केल्याची माहिती समोर आलीय. हे नाल्याचे काम चुरीसह गिट्टीमध्ये करण्यात आले आहे. बांधकामामध्ये सिमेंट आणि लोखंड अत्यंत कमी प्रमाणात वापरल्याने 6 जुलै रोजी झालेल्या दमदार पावसाने हे काम वाहून गेले आहे. विशेष म्हणजे नाला वाहून गेल्याची माहिती मिळताच संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने हा मलबा हटविण्याचे काम सुरू केले होते.

हे सुद्धा वाचा

रिधोऱ्यातील झेडपी शाळेत छताला गळती

अकोल्यात विद्यार्थ्यांच्या अंगावर छताचे पोपडे पडले. विद्यार्थ्यांचे शिक्षण मृत्यूच्या छायेत सुरू आहे. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिकस्त झाली. वर्ग खोल्यांना गळती लागली. छतही कोसळायला लागले. छत उडालेल्या वर्ग खोल्यात विद्यार्थी बसतात. 28 डिसेंबरला आलेल्या वादळी वाऱ्यात शाळेवरचे टिन उडाले होते. वारंवार निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची दखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेली नाही.

साकोली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात सर्वाधिक 310.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वात कमी भंडारा तालुक्यात 192.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 230.9 मिमी पाऊस पडला आहे. मागील तीन दिवसांपासून सर्वदूर पाऊस कोसळत आहे. रोवणीच्या कामाला वेग आला आहे. संपूर्ण जून महिना अपवाद वगळता कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अशातच जुलै महिन्याला प्रारंभ होताच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. 24 तासात जिल्ह्यात 6.2 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 230.9 मिमी पाऊस कोसळला आहे.

आलापल्ली-भामरागड मार्गातील रस्ता वाहून गेला

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री येत असलेल्या या पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे. भामरागड तालुक्यातील तालुका मुख्यालय असलेले रस्त्याचे काम सुरू असल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा कच्चा रस्ता रस्ता वाहून गेलेला आहे. भामरागड तालुक्यातील कुंमरगुंडा गावातील हा रस्ता वाहून गेला. पहाटेपासून वाहतुकीला मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.

राजोलीत शिरले पावसाचे पाणी

चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातील राजोली गावात लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामुळे घरात पावसाचे पाणी शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. राजोली गावात या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. ग्रामपंचायतने नाल्यांची व रस्त्याची उंची वाढविल्यामुळे गावात पावसाचे व नाल्याचे पाणी शिरल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. घरात पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामस्थ गावात अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...