राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, सामनातून आवाहन

सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा 'महाराष्ट्र बंद' आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, सामनातून आवाहन
संजय राऊत
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:51 AM

मुंबई : सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

म्हणून महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केलाय

उत्तर प्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे.

इतर राज्यांनीही महाराषअट्र बंदचं अनुकरण करावं

क्षांनी आजच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे.

शेतकरी देशाचा आत्मा, तो नष्ट करण्याचा प्रकार सुरु

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले. या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना.

मंत्रिपुत्राने गाडी खालून ठार मारलं

लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजप खासदारांच्या दारात उभे राहिले. शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले. तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.

मोदी, शहा आणि कृषीमंत्र्यांनी साधी संवेदनाही व्यक्त केली नाही

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रिपुत्रास अटक केलीच नाही. प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा शेतकऱ्यांचे खून करणाऱ्या मंत्रिपुत्रास सन्मानाने बोलावून अटक केली. अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी. शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत. कृषिमंत्र्यांनी तरी तत्काळ लखीमपूर खेरीत पोहोचायला हवे होते. ते गेले नाहीच. उलट तेथे जाणाऱ्यांना रोखून ठेवले.

वरुण आणि मनेका गांधीनी घटनेचा निषेध केला, त्यांना शिक्षा मिळाली

भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. तेव्हा वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली. लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे. तसे असेल तर ते गंभीर आहे. हिंदू आणि शीख एकच आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न देशाला आता परवडणारा नाही.

तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल!

वरुण गांधी हेसुद्धा इंदिरा गांधींचे नातू व संजय गांधींचे पुत्र आहेत. लखीमपूर खेरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त तापले व त्यांनी मत व्यक्त केले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे काय? शेतकऱ्यांच्या हत्या, त्यांच्या रक्ताचे पाट पाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल.

वरुण गांधींच्या अभिनंदनाचा ठराव शेतकरी संघटनांनी केला पाहिजे

वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही.

अशा सगळ्यांसाठी आजचा महाराष्ट्र बंद

त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे.

(Each And Every Citizen Should Participate in Maharashtra Bandh Appeal mahavikas Aaghadi Shivsena Sajay Raut)

हे ही वाचा :

Maharashtra Bandh | पुण्यानंतर मुंबईतही महाराष्ट्र बंदला काही व्यापारी संघटनांचा विरोध, शेतकऱ्यांना मात्र पाठिंबा

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.