नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर्स देशभर सुरू करणार : रामदास आठवलेंची घोषणा
नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून त्यांना लवकर आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू केले जाणार आहेत.

मुंबई : नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून त्यांना लवकर आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. (Early Intervention Centers will be set up across the country to Detect Disabilities in Newborn Babies : Ramdas Athawale)
वांद्रे येथील येथील अली यावर जंग इन्स्टिट्यूट येथे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते आज दिव्यांग बाळांसाठी अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमास रामदास आठवले अली यावर जंग येथून व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरची माहिती दिली.
देशात आज मितीस एकूण 2 कोटी 67 लाख दिव्यांग लोकांची संख्या आहे. देशात अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू झल्यानंतर नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून त्यावर त्वरित उपचार केले जातील. त्यामुळे भविष्यात दिव्यांग मुलांना होणारी पीडा अधिक होणार नाही. त्यासाठी सर्व पालकांनी आपल्या नवजात बाळांची अर्ली ईंटर्व्हेन्शन सेंटरमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
लवकर उपचार मिळाल्यास दिव्यांगता दूर करून बाळ सदृढ सक्षम होऊ शकते. त्यातून दिव्यांग जनांची वाढती संख्या कमी होत जाईल. त्यासाठी अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर महत्वपूर्ण आहेत असे रामदास आठवले म्हणाले.
जास्तीत जास्त कर्ज वाटप करा, एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये; छगन भुजबळांचे प्रशासनाला आदेश#ChhaganBhujbal #Farmers #CropLoan #Nashikhttps://t.co/eds0z30pzN
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
इतर बातम्या
सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन
(Early Intervention Centers will be set up across the country to Detect Disabilities in Newborn Babies : Ramdas Athawale)