रत्नागिरी जिल्हा हादरला! साखरपा, संगमेश्वर, देवरूख परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसराला भुकंपाचे धक्के बसले आहे.

रत्नागिरी जिल्हा हादरला! साखरपा, संगमेश्वर, देवरूख परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 9:11 AM

रत्नागिरी : जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसराला भुकंपाचे धक्के बसले. भर झोपेत असताना भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली, भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

चार रिस्टल स्केल तिव्रतेचा भूकंप 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री अडीचच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपांचे धक्के जाणावले, जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात या भूकंपाची तिव्रता अधिक होती. चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

महिनाभरातील दुसरी घटना

दरम्यान या भूकंपामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हाणी झाल्याची बातमी आतापर्यंत मिळालेली नाही. भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती  स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावर असल्याचे पहायला मिळत आहे. एक महिन्याच्या आत जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे.  या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

परळीत माफियाराज, पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मी थकलेली नाही, लढाई सुरू म्हणत थेट इशारा!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.