ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?

शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. (anil deshmukh's property)

ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:50 PM

नागपूर: शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. देशमुख हे एकूण 14 कोटीच्या संपत्तीचे मालक असून ईडीने त्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त केल्याने देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. (Ed attached anil deshmukh’s property in nagpur, know details of deshmukh’s property)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची ईडीकडून तपासणीही सुरू झाली. त्यानंतर आज ईडीने अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांचीही मालमत्ता नागपूरमधील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

14 कोटी संपत्तीचे मालक

अनिल देशमुख यांनी 2019मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 14 कोटी 6 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात 12.9 कोटी रुपये अचल आणि 1.7 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्यावर 4.6 कोटींचं कर्जही आहे. त्यांनी 2018-19मध्ये 16 लाखांचा कर भरला होता. 2017-18मध्ये त्यांनी 32 लाखांचा कर भरला होता. तर त्यांची पत्नी आरती देशमुख यांनी 2018-19मध्ये 14 लाख आणि 2017-18मध्ये 11 लाख रुपयांचा कर भरला होता.

दागिने आणि एलआयसीत गुंतवणूक

देशमुख यांनी दागिन्यांमध्ये 29 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर एलआयसीमध्ये 2 लाख 97 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही त्यांनी 3 लाख 86 हजारांची गुंतवणूक केली आहे.

शेती आणि बिगर शेती जमीन

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडे 1 कोटी 19 लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर 4 कोटी 15 लाखांची बिगर शेती आहे. त्यांच्याकडे नवी मुंबई आणि वरळीत दोन फ्लॅट आहे. एकाची किंमत 2 कोटी 23 लाख आहे, तर दुसऱ्याची किंमत 5 कोटी 27 लाख आहे.

साडेचार कोटींचं कर्ज

देशमुख यांच्यावर कर्जही आहे. त्यांच्यावर 57 लाख 12 हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच बँका आणि वित्तीय संस्थांकडून त्यांनी 3 कोटी 99 लाखांचं कर्ज घेतलं आहे. त्यांच्यावर एकूण 4 कोटी 60 लाखांचं कर्ज आहे.

स्वीय सहाय्यकांना अटक

देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) ही कारवाई केली होती. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते. (Ed attached anil deshmukh’s property in nagpur, know details of deshmukh’s property)

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, काही बार मालकांचेही जबाब!

ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त

अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला यत्किंचितही चिंता नाही!

(Ed attached anil deshmukh’s property in nagpur, know details of deshmukh’s property)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.