नागपुरात पोहचले ईडीचे पथक, कोणाकडे टाकला छापा ?

महाराष्ट्रात पुन्हा ई़डीचे पथक आले आहे. आता नागपुरात अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपतींकडे या पथकाने छापा टाकला आहे.

नागपुरात पोहचले ईडीचे पथक, कोणाकडे टाकला छापा ?
अंमलबजावणी संचालनालयImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 12:34 PM

नागपूर : नागपुरात अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate ) पथक पोहचले आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपतींकडे या पथकाने छापा टाकला आहे. औषधी व्यवसाय आणि बिल्डर असलेल्या उद्योगपतींकडे ही छापेमारी झाली आहे. या उद्योगपतीसंदर्भात मिळालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता या छापेमारीतून काय उघड होणार? यासंदर्भातील उत्सुकता नागपूरकरांना लागली आहे. ईडीच्या पथकाने मागील महिन्यात कोल्हापुरात होते. या ठिकाणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता नागपुरात चौकशी होत आहे.

नागपुरातील आर संदेश ग्रुपचे मालक रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल (Ramdev Agrawal of R Sandesh Group) यांचे घर आणि कार्यालयात ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच पोहचले. या पथकाने चौकशी सुरु केली. रम्मू अग्रवाल यांच्यासह आणखी काही व्यावसायिकांवर ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. नागपूरच्या कॅनल रोडवरील गौरी हाइट्स, रामदास पेठ परिसरातील रम्मू अग्रवाल यांच्या कार्यालयात कारवाई सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे संदेश ग्रुप

आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय आहेत. या व्यवसाच्या अनुषगांने इडीचे पथक कारवाई करत असल्याची माहिती मिळाली. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने जमिनी खरेदी केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात झालेल्या या खरेदी व्यवहाराची चांगलीच चर्चा नागपुरात सुरु होती. यामुळे चौकशीसाठी ईडीचे पथक शुक्रवारी पहाटेच पोहचले.

ED चे काय आहेत अधिकार

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ‘ईडी’चौकशी करते. सध्या या कारवाईच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाली आहे.ईडी परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) मदतीनेही ही कारवाई करते. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार विदेशी व्यापार तसेच विदेशी आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाते.

अंमलबजावणी संचालकांकडे चौकशीदरम्यान आरोपीस अटक करण्याचे अधिकार आहे. ईडीकडे छापेमारी तसेच संपत्ती जप्तीचे अधिकार आहेत. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नीरव मोदी, विजय माल्या यांच्या संपत्ती जप्ती केली आहे. ईडीचे कार्यक्षेत पाच श्रेत्रांमध्ये विभागलेले आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य असे ईडीचे पाच विभाग आहेत. ईडीमध्ये संचालक, विशेष संचालक, उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक ही पदेही महत्त्वाची आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.