सर्वात मोठी बातमी, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, रोहित पवारांना धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, रोहित पवारांना धक्का
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 5:31 PM

छत्रपती संभाजीनगर | 8 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्न सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असं ईडीने म्हटलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली. तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचादेखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.