टिटवाळा: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची 100 कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)
किरीट सोमय्या हे आज टिटवाळ्यातील गुरवली गावात आले होते. यावेळी त्यांनी विहंग आस्था हौसिंग कंपनीच्या जागांची पाहणी केली. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे 100 कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे 112 जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील 78.27 एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. तसेच या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. घोटाळ्यातील 100 कोटीची रक्कम परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
ईडीचे बोर्ड
“पीएमएलए कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे. Prevention of Money Laundering Act, 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण ( Trespassing Prohibited) करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये”, असं या बोर्डावर ईडीने लिहिलं असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
ठाकरे सरकारच्या दबावाला भीक घालत नाही
सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे, असं ते म्हणाले. (ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)
वाहतूक कोंडीचा फटका
टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती ही थांबली आहे. महापालिका निवडणूका जवळ आलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत जनता ठाकरे सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. (ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)
ED ने शिवसेना प्रताप सरनाईक यांच्या 112 जमिनी ताब्यात घेतल्या
विहांग आस्था हाउसिंग कंपनीच्या गुरवली, टिटवाळा येथील 78.27 एकर, 112 मिळकतींचा ED ने काल ताबा घेतला. ED चे बोर्ड लावले. NSEL घोटाळ्याचे ₹100 कोटी, विहांग आस्था कंपनी मधे वळविण्यात आले होते. मी त्या जागेची पाहणी केली pic.twitter.com/owLD5rQIO2
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 10, 2021
संबंधित बातम्या:
प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया
(ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)