शाळा सुरु होईपर्यंत फी घेऊ नका, अन्यथा कारवाई : वर्षा गायकवाड
देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले (Varsha Gaikwad on school fees).
पुणे : एकिकडे राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले (Varsha Gaikwad on school fees).
पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांना पुढील वर्षाचे वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क न घेण्याचे निर्देश दिले. दरम्यान, हरियाणा सरकारने देखील जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच शालेय पोषण आहार योजनेतंर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबतही आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली
आईच्या औषधांसाठी निघालेल्या कॉन्स्टेबललाच पोलिस उपअधीक्षकांकडून मारहाण, बोटं फ्रॅक्चर
Corona LIVE: नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंन्टाईन
संबंधित व्हिडीओ:
Varsha Gaikwad on school fees